थंडीच्या सीझनमध्ये सोपी पौष्टिक शेंगदाणा व गुळाची चिक्की कशी बनवायची
Nutritious Shengdana Gulachi Chikki Peanut Chikki Recipe In Marathi
आता थंडीचा सीझन चालू आहे तेव्हा शेंगदाणा व गुळाची पौस्टिक चिक्की बनवावी. अश्या प्रकारची चिक्की आरोग्यदाई आहे. कारण शेंगदाणा व गुळाची पौस्टिक चिक्की ही आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
The Marathi language video Nutritious Shengdana Gulachi (Peanut) Chikki be seen on our YouTube Channel of Nutritious Shengdana Gulachi (Peanut) Chikki
मुलं चॉकलेट खातात त्यामुळे दात खराब होतात त्या आयवजी त्यांना शेंगदाणा व गुळाची पौष्टिक चिक्की खायला द्या ती जास्त फायदेशीर आहे. आपण चिक्की बनवताना साखर सुद्धा वापरू शकतो पण साखरेच्या आयवजी गूळ वापरणे योग्य आहे. गुळामध्ये साखरे पेक्षा जास्त खनिज द्रव्ये असतात. गुळामध्ये जीवनसत्व “ बी 1, बी 2, “सी” व “ए” आहे. गुळामध्ये मॅगेनीज आहे व कार्बोहायड्रेट आहे. चिक्कीमध्ये एटिऑक्सिडेन्ट आहेत त्यामुळे डिमेशिया व अलजाईमर सारख्या आजाराशी लढण्याची शक्ति मिळते.
शेंगदाणा व गुळाची चिक्की बरेच दिवस टिकते. आपण प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 20 वड्या बनतात
चिक्की बनवण्याचे साहीत्य:
1 कप शेगदाणे (भाजून सोलून)
1 कप गूळ (किसून)
1 टे स्पून तूप
कृती: प्रथम शेगदाणे भाजून सोलून घ्या. गूळ किसून घ्या. पोळपाट लाटणे ला तूप लावून बाजूला ठेवा.
एका जाड बुडाच्या कढईमद्धे गूळ व तूप घेऊन मध्यम विस्तवावर गूळ एकसारखा हलवत रहा. गूळ विरघळला की थोडा घट्ट व्हायला लागेल मग एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये गुळाच्या पाकाचे 2 थेंब टाका मग गूळ लगेच विरघळला नाहीतर पाक तयार झाला असे समजावे.
आता गुळाच्या पाकात भाजून सोललेले शेगदाणे घालून चांगले मिक्स करा. सगळ्या शेगदाण्याला गूळ लागला पाहिजे. मग मिश्रण तूप लावलेल्या पोळपाटावर घालून एक सारखे लाटून घ्या. गरम असताना वड्या कापा.