पुलाव बनवण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काही पुलाव कसे बनवायचे टे आपण पाहिले. आता थंडीचा सीझन चालू आहे. बाजारात अगदी मस्त ताज्या भाज्या मिळतात. आता हिरव्या ताज्या मटारचा सीझन पण चालू आहे. मटार वापरुन बरेच पदार्थ बनवता येतात. तसेच मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
The Marathi language video Vegetable Matar Kofta Pulao be seen on our YouTube Channel of Green Peas Kofta Pulao with Vegetable or Kofta Biryani
वेज कोफ्ता पुलाव बनवताना काही निवडक भाज्या वापरल्या आहेत व कोफ्ते बनवताना हिरवे ताजे मटार वापरले आहेत. त्यामुळे ह्या पुलावची टेस्ट खूप निराळी व मस्त लागते.
वेज कोफ्ता पुलाव तिखट नाही त्यामुळे मुले अगदी आवडीने खातात. तसेच तो पौस्टिक सुद्धा आहे कारण ह्याच्या मध्ये भाज्या आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
कोफ्ता करिता:
3 मध्यम आकाराचे बटाटे (उकडून, सोलून,किसून)
¼ कप ताजे हिरवे मटार
2 हिरव्या मिरच्या
½” आले तुकडा
5-6 लसूण पाकळ्या
2 टे स्पून कॉर्नफ्लोर
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
पुलाव करिता:
2 वाट्या तांदूळ
2 वाट्या गरम पाणी
1 छोटा कांदा (उभा पातळ चिरून)
1 छोटे गाजर (धुवून सोलून उभे पातळ काप)
1 छोटी शिमला मिरची (चिरून)
2 टे स्पून मटार
5-6 बिन्स (शिरा काढून (चिरून)
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
7-8 मिरे
1 दालचीनी तुकडा
2 हिरवे वेलदोडे
1 तमालपत्र
कृती: प्रथम बटाटे उकडून घ्या. कांदा, शिमला मिरची, गाजर, बिन्स उभे पातळ चिरून घ्या.
कोफ्ते बनवण्यासाठी: प्रथम बटाटे उकडून, सोलून व किसून घ्या. मिक्सरच्या भांड्यात हिरवे ताजे मटार, हिरवी मिरची, आले-लसूण घालून जाडसर वाटून घ्या.
एका बाउलमध्ये बटाटे, मटार मीठ व कॉर्नफ्लोर मिक्स करून घ्या. मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. भात तयार झाला की ही गोळे तळून पुलाव मध्ये मिक्स करा.
पुलाव बनवण्यासाठी: तांदूळ धुवून बाजूला झाकून ठेवा.
एका नॉन स्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मिरे, दालचीनी, वेलदोडे, तमालपत्र घालून मिक्स करून त्यामध्ये कांदा घालून थोडा परतून घ्या. कांदा परतून झाला की त्यामध्ये चिरलेल्या भाज्या घालून 2 मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्या. मग त्यामध्ये धुतलेले तांदूळ व मीठ घालून मिक्स करून 2-3 मिनिट तांदूळ परतून घ्या.
तांदूळ परतून झाल्यावर त्यामध्ये जेव्हडे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट गरम पाणी घालून मिक्स करून पॅनवर झाकण ठेवून मंद विस्तवावर 10 मिनिट भात शिजवून घ्या. मधून एकदा झाकण काढून भात हलवून घ्या. 10 मिनिट झालेकी तळलेले कोफ्ते भातावर ठेवून परत झाकण ठेवून 2-3 मिनिट भात शीजवून घ्या.
गरम गरम पुलाव भजी, कबाब किंवा कटलेट बरोबर सर्व्ह करा.