कोलेस्ट्रॉल जर वाढले त्याचे काय कारण आहे व ते घरगुती उपाय करून कसे कमी करायचे.
आज काल आपली जीवनशैली खूप बदलली आहे. म्हणजेच आपले राहणे, खाणे व पिणे ही सर्व काही बदलले आहे. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो व आपल्याला काहीना काही आजाराला तोंड द्यावे लागते. त्यामध्ये एक आजार म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे. आजकाल जर आपण पहिले तर 10 जणांमद्धे 6-7 लोकाना कोलेस्ट्रॉलचा त्रास होत आहे. ह्या वरुन आपण अंदाज करू शकतो की डायबीटीजच्या सारखेच बरेच जण कोलेस्ट्रॉलच्या त्रासानी ग्रासले आहेत. ज्याना कोलेस्ट्रॉलचा त्रास होत आहे त्यांना सर्वात जास्त हार्टअटॅकचा धोका असतो. त्याच बरोबर किडनी स्टोन किंवा किडनी फेल होऊ शकते.
आपण पाहूया कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे काय आहेत व घरगुती उपाय करून आपण कोलेस्ट्रॉल कसे नियंत्रणात ठेऊ शकतो.
The Marathi language video How to reduce cholesterol at home be seen on our YouTube Channel of Home Remedies for reduce cholesterol at home
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे:
सारखे चिंता ग्रस्त राहणे
योग्य आहार घेणे किंवा फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणे
दारू पिणे
आनुवंशिकता
व्यायामाचा अभाव
अति प्रमाणात सिगरेट पिणे
शरीराचे वजन वाढणे
कोलेस्ट्रॉल जर वाढले तर कमी करण्याचे घरगुती उपाय:
अनोश्या पोटी लसूण खाणे:
लसूणमध्ये एलिसिन नावाचे तत्व आहे. त्यामुळे हार्टचे आरोग्य चांगले राहून ब्लड प्रेशर नॉर्मल राहते. रोज सकाळी अनोश्या पोटी लसूनच्या 2-3 पाकळ्या खल्याकी कोलेस्ट्रॉल कमी होते.
आक्रोडचे सेवन करावे:
अक्रोड सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. अक्रोडच्या सेवनाने ब्लड वेसल्स च्या वर जमा झालेले कोलेस्ट्रॉल हळू हळू विरघळण्यास मदत करते व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
ओट्सचे सेवन करावे:
ओट्सच्या सेवनाने सुद्धा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. कारण त्याच्या मध्ये ग्लुकॉन ह्या नावाचे तत्व आहे. हेच ग्लुकॉन आपल्या आतडयाची सफाई करायचे काम करते. तसेच आपले शरीर कोलेस्ट्रॉल शोषण करण्याचे काम करू शकत नाही. ओट्सचे तीन महिन्या पर्यन्त सेवन केलेकी त्याचे फायदे दिसून येतात.
लाल रंगाचा कांदा:
लाल रंगाचा कांदा सेवन केल्याने सुद्धा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्यासाठी 1 चमचा लाल कांद्याचा रस व 1 चमचा मध मिक्स करून 1 महिना सेवन करावे त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.