दोन मिनिटांत बनवा तिळाचे लाडू बिना पाकाचे मकरसंक्रांतीसाठी
मकर संक्रांत 14 जानेवारी गुरुवार ह्या दिवशी आहे. महाराष्ट्रात महिला मकर संक्रांत हा सण अगदी आनंदाने साजरा करतात. नवीन वर्षातील हा पहिला सण. मकर संक्रांती ह्या दिवशी तीळ व गूळ वापरुन लाडू, वड्या किंवा पोळ्या बनवतात.
तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो ते आपण ह्या आंगोदरच्या पहिले आहे.
The Marathi language video Soft Sesame Laddu Til gul Ladoo Without Syrup Prepare in 2 Minutes of be seen on our YouTube Channel of Soft Til Ladoo Without Syrup In 2 Minutes For Makar Sankranti 2021
तिळाचे लाडू आपण अगदी निराळ्या पद्धतीने बनवू शकतो त्यासाठी गुळाचा पाक बनवायची गरज नाही अगदी झटपट तोंडात टाकताच विरघळतील असे लाडू आपण बनवू शकतो. अश्या प्रकारचे तिळाचे लाडू बनवायला अगदी सोपे व चवीष्ट लागतात.
वाढणी: 18-20 लाडू बनतात
साहीत्य:
1 कप तीळ
¾ कप गूळ (किसून किंवा चिरून)
2 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
1 टे स्पून साजूक तूप
½ टी स्पून वेलची पावडर
कृती: गूळ किसून किंवा चिरून घ्या. मग पॅन गरम करून त्यामध्ये 2-3 मिनिट तीळ छान खमंग भाजून घ्या. मग विस्तव बंद करून तीळ थंड होऊ द्या. तीळ थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात तीळ घेऊन थोडे जाडसर ग्राइंड करून घ्या.
मग त्यामध्ये चिरलेला गूळ, डेसिकेटेड कोकनट, तूप व वेलची पावडर घालून परत थोडेसे ग्राइंड करून घ्या. मग ग्राइंड केलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या व त्याचे एक सारखे छोटे छोटे लाडू बनवून घ्या.