आता हिवाळ्याचा सीझन आला की बाजारात हिरवे ताजे मटार अगदी स्वस्त मिळतात. मटार वापरुन आपण अनेक चवीष्ट पदार्थ बनवू शकतो. हिरवे ताजे मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. त्यामुळे आपण ह्या सीझन मध्ये वर्षभरासाठीचे मटार साठवून ठेवू शकतो मग आपण वर्षभर त्याचे नानाविध पदार्थ बनवू शकतो. मटारचे सर्व पदार्थ मस्त लागतात.
आज आपण मटार वापरुन अजून एक मस्त पदार्थ बनवणार आहोत. अश्या प्रकारचा पदार्थ आपण नष्टयला बनवू शकतो मुले अगदी आवडीने अश्या प्रकारचा चटपटीत पदार्थ आवडीने खातात.
The Marathi language video Hirwe Taje Matar Pasun Banwa Khamang Nashta Mulansathi of be seen on our YouTube Channel of Tasty Crispy Green Peas Nashta For Kids Within 10 Minutes
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
½ कप हिरवे ताजे मटार
1 कप रवा
1 टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
2 टे स्पून दही
मीठ चवीने
1 कप पाणी
¼ टी स्पून बेकिंग सोडा
फोडणी करीता:
2 टे स्पून तेल
2 टी स्पून मोहरी
2 टी स्पून जिरे
कृती: प्रथम एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये हिरवे ताजे मटार घालून 3-4 मिनिट मध्यम विस्तवावर मटार शिजवून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्या.
एका मध्यम आकाराच्या बाउलमध्ये रवा (रवा बारीक किंवा जाड कोणता सुद्धा चालेल), आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, दही व मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये 1 कप पाणी घालून घालून मिक्स करून 5-10 मिनिट झाकून बाजूला ठेवा म्हणजे रवा चांगला भिजले.
मग रव्याच्या मिश्रणात जाडसर वाटलेले मटार घालून मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये आपण बेकिंग सोडा (खायचा सोडा) घालून हळुवार पणे मिक्स करून घ्या.
नॉन स्टिक पॅन गरम करून घ्या त्यामध्ये 1 टे चमचा तेल घालून तेल गरम झाल्यावर 1 टी मोहरी, 1 टी स्पून जिरे ¼ टी स्पून हिंग (पाहिजे तर घाला) मग एक सारखे पॅन मध्ये पसरवून घेऊन त्यावर बनवलेल मिश्रण घालून चमच्यानि एक सारखे पसरवून घ्या. पॅनवर झाकण ठेवून 5-7 मिनिट मध्यम विस्तवावर बेक करून घ्या. 5-7 मिनिट झाल्यावर झाकण काढून हळुवार पणे सूरीच्या सहायाने बाजूनी कडा सैल करून घ्या. मग पॅन वर एक प्लेट ठेवून नाश्ता उलट करून घ्या.
आता परत पॅन मध्ये 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये 1 टी स्पून मोहरी व 1 टी स्पून जिरे घालून एक सारखे पसरवून त्यावर झाऱ्याच्या सहयाने किंवा उलथण्याच्या सहयाने नाश्ता दुसऱ्या बाजूनी बेक करायला ठेवा. पॅनवर परत 3-4 मिनिट झाकण ठेवून नाश्ता बेक करून घ्या. 3-4 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करून झाकण काढून नाश्ता प्लेटमध्ये काढून घ्या.
गरमा गरम हिरव्या ताज्या मटारचा नाश्ता टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.