चांगला चविष्ट स्वयंपाक करणे ही एक कला आहे. काही वेळेस आपले चित्त नसेल किंवा मूड नसेल तर आपला स्वयंपाक बघडू शकतो. मग पदार्थामध्ये कधी मीठ जास्त होते तर कधी मिरची जास्त होते. जेव्हा नवीन लग्न झालेल्या मुली स्वयंपाक करायला शिकतात किंवा मुले-मुली शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी बाहेर रहातात तेव्हा नवीन नवीन स्वयंपाक करताना मीठ किंवा मिरची जास्त होते तर त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत.
The Marathi language video Tricks and Tips to remove excess Salt, Mirchi, Masala and Oil from dish can of be seen on our YouTube Channel of 6 Tips and Tricks to remove excess Salt Mirchi Masala and Oil form dish
आता आपण पाहूया की जर मीठ, मिरची, मसाला किंवा तेल जास्त झाल तर त्यासाठी काही सोप्या 6 ट्रिक्स आहेत. त्याजर आपण पाळल्या तर आपला बिघडलेला पदार्थ चांगला होईल व त्याची टेस्ट सुद्धा बिघडणार नाही.
लाल मिरची पावडर जास्त झाली तर काय करायचे
जर स्वयंपाकामध्ये लाल मिरची पावडर जास्त झालीतर दूध किंवा दही चा वापर केला जातो. आमटी किंवा ग्रेव्ही मध्ये लाल मिरची पावडर जास्त झाली तर घट्ट दही घालावे त्यामुळे आमटीचे टेक्सचर चांगले होईल व तिखट पणा सुद्धा कमी होईल.
पूर्ण स्वयंपाक मसाले दार झाला तर
जेव्हा पूर्ण स्वयंपाक मसालेदार झाला तर आपल्याला समजत नाही की काय करायचे तसेच कोणता मसाला जास्त झाला आहे. अश्या वेळेस थोडशी साखर किंवा मध मिक्स करावे पण साखर अगदी थोडेशी मिक्स करावी. म्हणजे पदार्थ गोड बनणार नाही.
मीठ व मिरची जास्त झाली
जर जेवणात मीठ व मिरची सुद्धा जास्त झाली तर शेगदान्याचा कूट मिक्स करावा किंवा पिनट बटर टाकू शकता. पण शेंगदाणा पेस्ट सर्व भाज्या मध्ये चालत नाही.
अश्या वेळेस एक बटाटा सोलून घाला त्यामुळे मीठ व लाल मिरची बटाटा शोषून घेईल. सर्व्ह करताना बटाटा काढून टाका.
अजून एक उपाय म्हणजे आपली गव्हाची कणिक घेऊन त्याचे छोटे 3-4 गोळे बनवा व आमटी मध्ये घाला नंतर काढून टाका.
मीठ जास्त झाले तर
पदार्थमध्ये मीठ जास्त झाले तर अगदी कमी कष्टात आपण लगेच मिठाचे प्रमाण कमी करू शकतो. ते म्हणजे लिंबू रस घालून. लिंबू रस घातला तर त्याच्या अंबाटपणा मुळे मिठाचा खारट पणा कमी होतो.
मसाले जास्त झालेतर
पदार्थमध्ये मीठ, मसाला व मिरची जास्त झाली तर एक अंडे उकडून त्याचा पूर्ण पिवळा योक घाला.
भाजी किंवा आमटीमध्ये तेल जास्त झाले
भाजी किंवा आमटी मध्ये तेल जास्त झाले तर दोन ब्रेड स्लाईस घेऊन त्याचे तुकडे करून घाला ब्रेड जास्तीचे तेल शोषून घेईन.