आता थंडीच्या दिवसांत गाजर व हिरवे ताजे मटार चा सीझन चालू आहे त्यामुळे आपल्याला अगदी स्वस्त व मस्त गाजर व मटार मिळतात. आपण गाजर व मटार वापरुन एक मस्त टेस्टी डिश बनवणार आहोत. मुलांना व तसेच मोठ्यांना सुद्धा ही डिश नक्की आवडेल.
The Marathi language video Nutritious Carrot Green Peas Nashta For Kids can of be seen on our YouTube Channel of Healthy Gajar Matar Nashta Mulansathi
गाजर व मटार दोन्ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. ही डिश बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 3 जणांसाठी
साहीत्य: आवरणांसाठी:
1 कप रवा
½ कप दही
1 टी स्पून मीठ
½ कप पाणी
¼ टी स्पून बेकिंग सोडा
½ कप गाजर (पयूरी)
साहीत्य : सारणांसाठी:
1 कप मटार
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
4-5 लसूण पाकळ्या
2 हिरव्या मिरच्या
½ टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
1 चमचा तेल
¼ टी स्पून हळद
¼ टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून गरम मसाला
कृती: कांदा चिरून घ्या. लसूण व हिरवी मिरची चिरून घ्या. एका बाउलमध्ये रवा, दही व मीठ मिक्स करून घेऊन त्यामध्ये पाणी घालून मिक्स करून 25-30 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
एक नॉनस्टिक पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, लसूण हिरवी मिरची घालून थोडेसे परतून मटार घाला मग मिक्स करून 1-2 मिनिट परतून घ्या. पॅन वर 2-3 मिनिट झाकण ठेवून मंद विस्तवावर वाफवून घ्या. मग विस्तव बंद करून मटार थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्या.
एका कढईमध्ये गाजर घेऊन थोडे पाणी घालून वाफवून 2-3 मिनिट घ्या. मग थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
रव्याच्या मिश्रणात ¼ टी स्पून बेकिंग सोडा व ½ कप पाणी घालून हळुवार पणे मिक्स करा. मिश्रणाचे दोन भाग करून एक भाग पंढराच ठेवा. दुसऱ्या भागात गाजराची पेस्ट घालून मिक्स करून घ्या.
नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा त्याला थोडे तेल लाऊन एका मध्यम आकाराच्या डावानी रव्याचे मिश्रण घाला अगदी थोडेसे पसरून घ्या. मग त्यावर मटारचे बनवलेले 1 टे स्पून मिश्रण ठेवून त्यावर परत रव्याचे एक डाव मिश्रण घालून हळुवार पणे पसरवून घ्या. मटारचे मिश्रण सर्व झाकले गेले पाहिजे बाजूनी थोडेसे तेल घालून पॅन वर 3-4 मिनिट झाकण ठेऊन मंद विस्तवावर बेक करून घ्या. मग झाकण काढून बनवलेला नाश्ता उलट करून घ्या. परत बाजूनी थोडेसे तेल घालून 2-3 मिनिट मंद विस्तवावर बेक करून घ्या.
गरम गरम दोन्ही प्रकारे बनवलेला नाश्ता टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.