डाळिंब आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्याच्या सेवनाचे 100 फायदे असून बऱ्याच रोगावर ते गुणकारी आहे. त्याचे लाल चुटुक दाणे खूप फायदेमंद आहेत. त्याच्या औषधी गुणांनी तो प्रसिद्ध आहे. डाळिंबाच्या दाण्यां बरोबर त्याची साल सुद्धा खूप गुणकारी आहेत. डाळिंबामध्ये विटामीन, फॉलिक एसिड व एंटी ऑक्सिडेन्ट बऱ्याच प्रमाणात आहे.
The Marathi language video Health Benefits of Pomegranate and Skin , Heart, Monthly Period, Hypertension, Pimples can of be seen on our YouTube Channel of Benefits of Pomegranate and its Skin
आता आपण पाहू या डाळींबाचे फायदे
स्तन कॅन्सर होण्यापासून बचाव:
डाळिंबाच्या दाण्यामद्धे एंड्रोजन हार्मोन ना एस्ट्रोजन हार्मोन मध्ये बदलण्याचे तत्व आहे त्यामुळे त्याच्या सेवनाने कॅन्सर होऊ शकत नाही.
हायपर टेंशन च्या समस्या पासून आराम:
डाळिंबाचा ज्यूस सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. त्याच्या ज्यूसमध्ये विटामीन व पोट्याशीयम भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे ते फायदेमंद आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
पोटावरील चरबी कमी होते
डाळिंबाच्या ज्यूसमध्ये 54 कॅलरिज आहेत. त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी फायदेमंद आहे.
डाळिंबाच्या दाण्या बरोबरच डाळिंबाच्या सालामध्ये सुद्धा भरपूर गुण आहेत. आपण डाळिंब खल्यावर साल टाकून देतो. पण ते टाकून न देता त्याच्या उपयोग कसा करायचं ते पाहू या.
डाळींबाचे साल सुकवून त्याची पावडर बनवून एका बाटलीमध्ये भरून ठेवा. किंवा ती वाटून त्याचा रस वापरू शकता. त्याचा उपयोग सुंदरता वाढवण्यासाठी होतो.
डाळिंबाची साल टॉन्सिल्स, हृदय, रोग, मुंहासे, तोंडाचा वास, खोकला ह्या रोगा पासून आराम मिळतो.
घसा दुखी व घश्यामध्ये खवखवणे:
जर घशातील टॉन्सिल्स दुखत असतील तर डाळिंबाच्या सालाची पावडर पाण्यामध्ये उकळून घ्या. मग त्याचा काढा बणल्यावर गाळून थोडा थंड झाल्यावर गुळण्या करा. असे दिवसातून 4-5 वेळा करा. त्याने जरूर आराम मिळेल.
हृदय रोगापासून बचाव:
त्याच्या सालामध्ये भरपूर एंटी ऑक्सिडेन्ट आहेत. टे हृदय रोगापासून आराम देतात. त्याच बरोबर कोलेस्ट्रॉलच्या लेवलला बरोबर ठेवतात. एक चमचा डाळिंबाच्या सालाची पावडर एक कप गरम पाण्यात घालून त्याचे सेवन नियमित घेऊन आपला आहार नीट घेऊन त्या बरोबर व्यायाम करावा.
मुंहासेच्या समस्या दूर होतील:
डाळिंबाची साल सुकवून त्याला भाजून थंड करून त्याची पावडर करून जेथे मूहासे आले आहेत तेथे लावावे.
चेहऱ्यावरील सुरकुत्या:
डाळिंबाची साल सुकवून त्याची पावडर बनवून त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करून त्याचा फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावावा त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा चांगला दिसेल.
तोंडाचा वास व हिरड्यासाठी उपयोगी:
एक ग्लास पाण्यात सालाची पावडर मिक्स करून त्या पाण्यांनी 2-3 वेळा गुळण्या करा म्हणजे तोंडाचा वास येणार नाही तसेच हिरड्या मजबूत होण्यासाठी सालाची पावडर व मिरे पावडर मिक्स करून हिरड्यावर मालीश करा.
मासिक पाळीसाठी फायदेमंद:
मासिक पाळीमध्ये काही स्त्रीयांना जास्त ब्लीडिंग होते त्यांनी डाळिंबाच्या सालाची पावडर पाण्या बरोबर सेवन करावी.
खोकला:
सालाची पावडर 5 ग्राम व 0,10 ग्राम कपूर मिक्स करून त्याचे चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा पाण्यात मिक्स करून सेवन केल्यास खूप खोकला झाला असेल तर कमी होईल
सनस्क्रीनचे काम करते
सुकलेल्या सालाची पावडर कोणत्यासुद्धा तेलात मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास सन टेनिग पासून आराम मिळतो.
हाडे मजबूत बनतात
रोज रात्री झोपण्याच्या अगोदर दोन चमचे सालाची पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यावी त्यामुळे हाडे मजबूत बनतात.