बीटरूट व गाजर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्याची कोशिंबीर किंव रायता खूप छान लागते. दिसायला सुद्धा आकर्षक दिसते. गाजर बीटरूट रायता वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे. आपण अश्या प्रकारची कोशिंबीर किंवा रायता बिर्याणी किंवा पुलाव बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो.
बीटरूट चे अनेक आरोग्यदाई फायदे आहेत. ज्या लोकाना एनिमिया चा त्रास आहे त्यांनी बीटरूट चे सेवन करणे हितावह आहे. बीटरूट मध्ये आयर्न, विटामीन, सोडियम, पोट्याशीयम, फॉस्फरस व मिनरल आहे. बीटरूट आपल्या शरीरातील रक्त वाढवून ते शुद्ध करते. काही लोकाना बिररूटचे ज्यूस आवडते तर काही जणांना त्याची कोशिंबीर आवडते. बीटरूट खराब कोलेस्ट्रॉलला कमी करते. त्याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते व थकान दूर होते. तसेच शुगर लेवल कमी करते.
The Marathi language video Healthy Beetroot Carrot Koshimbir or Raita recipe in Marathi can of be seen on our YouTube Channel of Nutritious Zatpat Gaajar Beetroot Koshimbir or Raita
गाजरच्या सेवनाने हार्ट संबंधित तक्रारी दूर होतात. पचनशक्ति सुधारते तसेच त्यामध्ये कॅरेटीन आहे त्यामुळे कॅन्सर पासून बचव होतो. कच्चे गाजर खाल्ले तर त्याने वजन कमी होते. त्यामध्ये लोह आहे तर एनिमिया दूर होतो. शरीरात ऊर्जा निर्माण होऊन रोग प्रतिकात शक्ति वाढते.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
1 कप दही
2 टे स्पून गाजर (किरून)
2 टे स्पून बीटरूट (किसून)
1 छोटी हिरवी मिरची (चिरून)
1 टे स्पून कोथबिर (चिरून)
½ टी स्पून जिरे (भाजून कुटून)
मीठ चवीने
कृती: प्रथम बीटरूट व गाजर स्वच्छ धुवून, सोलून किसून घ्या. मिरची बारीक चिरून घ्या. कोथबिर स्वच्छ धुवून चिरून घ्या. जिरे थोडेसे भाजून कुटून घ्या. दही एक सारखे घुसळून घ्या.
एका बाउलमध्ये दही, किसलेले बीटरूट, गाजर, कोथबिर, कुटलेले जिरे, मीठ घालून मिक्स करून घ्या. मग एका बाउलमध्ये काढून कोथबिर ने सजवून सर्व्ह करा.