मुले बीटरूट खायचा कंटाळा करतात तर त्यांना अश्या प्रकारे बीटरूटचे लाडू बनवून द्या ते मिनिटांत संपवतील. अश्या प्रकारचे लाडू बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत तसेच त्याचा रंग पण छान आकर्षक दिसतो.
The Marathi language video Healthy Beetroot ladoo for kids tiffen recipe in Marathi can of be seen on our YouTube Channel of Nutritious Zatpat Beetroot Ladoo for kids
बीटरूट आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेमंद आहे. ज्याना एनिमियाचा त्रास होतो. त्यांनी बीटरूट चे सेवन करणे हितावह आहे. बीटरूट मध्ये आयर्न, विटामीन, सोडियम, पोट्याशीयम, फॉस्फरस व मिनरल आहे. बीटरूट आपल्या शरीरातील रक्त वाढवून ते शुद्ध करते. काही लोकाना बिररूटचे ज्यूस आवडते तर काही जणांना त्याची कोशिंबीर आवडते. पान आपण आज बीटरूटचे लाडू बनवणार आहोत. बीटरूट खराब कोलेस्ट्रॉलला कमी करते. त्याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते व थकान दूर होते. तसेच शुगर लेवल कमी करते.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 6 लाडू बनतात
साहीत्य:
1 कप बीटरूट (किसून)
2 टी स्पून साजूक तूप
1 कप दूध
½ कप साखर (किंवा थोडी कमी घातली तरी चालेल)
2 टे स्पून मिल्क पावडर
2 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
1 टे स्पून डेसिकेटेड कोकनट (लाडू रोल करण्यासाठी)
¼ टी स्पून वेलची पावडर
कृती: प्रथम बीटरूट धुवून सोलून किसून घ्या.
एका पॅनमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये किसलेले बीटरूट घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये दूध घालून दूध आटे पर्यन्त शिजवून घ्या. मिश्रण थोडे कोरडे झाले की त्यामध्ये साखर घालून मिश्रण थोडेसे कोरडे होई पर्यन्त आटवून घ्या.
आता त्यामध्ये मिल्क पावडर, डेसिकेटेड कोकनट व वेलची पावडर घालून मिक्स करा. मिश्रण आळले की विस्तव बंद करून त्याचे लाडू वळून घ्या. लाडू वळून झालेकी डेसिकेटेड कोकनटमध्ये रोल करा म्हणजे घोळून घ्या. अश्या प्रकारे सर्व लाडू बनवून डेसिकेटेड कोकनटमध्ये घोळून घ्या.
लाडू तयार झाल्यावर सर्व्ह करा.