अगदी सोपा घरगुती उपाय करून आपण 10 मिनिटांत पार्लर सारखा चेहऱ्यावर चमक आणू शकता व कितीही थकलेले असला तरी पार्टीला अगदी फ्रेश होऊन जाऊ शकता.
ऑफिसच्या कामानी किंवा अन्य कोणत्या कामानी आपण अगदी खूप थकले आहात व आपल्याला पार्टीला किंवा महत्वाच्या मीटिंग ला जायचे आहे किंवा लग्नाला जायचे आहे. तर काळजी करू नका. त्यासाठी एक सोपी टीप देत आहे. त्यासाठी आपल्याला एक चमचा साखर वापरायची आहे. त्यामुळे आपला चेहरा अगदी 10 मिनिटांत फ्रेश होऊन तुम्हाला अगदी ताजे तवाने वाटेल. ते पण पार्लरमध्ये नजाता घरच्या घरी अगदी मोफत.
The Marathi language video Home Remedy for glowing skin with sugar and coffee in 10 minutes in Marathi can of be seen on our YouTube Channel of Home Remedy For Glowing Skin in 10 Minutes with Sugar
त्यासाठी तुम्हाला स्वयंपाक घरात जायचे आहे तेथे तुम्हाला एक स्टीलची वाटी घेऊन एक चमचा साखर घ्यायची आहे. ती साखर आपले ब्युटि टॉनिकचे कम करेल.
वाटीमद्धे साखर घेतल्यावर त्यामध्ये 1/2 चमचा कॉफी पावडर व एक चमचा गुलाबपाणी घालून मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर हलक्या हातांनी त्याचा लेप लाऊन हळुवारपणे रगडा.
जर तुमची त्वचा ड्राय आहे तर मिश्रणात 1/2 चमचा ऑलिव ऑइल किंवा नारळाचे तेल घालू शकता. त्यामुळे त्वचेचा कोरडा व रुक्ष पणा दूर होऊन त्वचा चांगली होईल.
मिश्रण चेहऱ्यावर लावल्यावर चेहरा व गळा 5-6 मिनिट मसाज करा. त्यानंतर स्वच्छ साध्या पाण्यानि चेहरा स्वच्छ धुवा. नंतर कॉटनच्या टॉवेलनि चेहरा हळुवार पणे पुसून घ्या. मग चेहऱ्यावर टोनर लावा. जर आपल्याला पाहिजेतर गुलाबपाणी सुद्धा लावू शकता. मग चेहऱ्यावर मॉइश्चराइजर लावा. जर तुमची त्वचा तेलकट म्हणजेच ऑईली आहे तर वॉटर बेस्ड मॉइश्चराइजर लावू शकता. जर आपली त्वचा कोरडी आहे तर ऑइल बेस्ड मॉइश्चराइजर लावू शकता.
आता तुमच्या त्वचेचा डलनेस व रफनेस निघून गेला आहे. आता आपण कोणते सुद्धा चांगले क्रीम लावू शकता. व पार्टीला जायला तयार होऊ शकता ह्यासाठी आपल्याला फक्त 10 मिनिट वेळ लागला.
कधी सुद्धा आपल्याला आपला चेहरा डल वाटत असेल तर हा सोपा घरगुती उपाय नक्की करा. अगदी स्वस्त व मस्त
पॅक आपल्या चेहऱ्यावर कसे काम करतो
कॉफी, साखर व गुलाबपाणी ह्याचे मिश्रण कोमेजलेली त्वचा च्या साठी एक प्रकारचे टॉनिक आहे. कारण की कॉफीन आपले ब्लड सरकुलेशन वाढवते. व साखरेतून ग्लुकोज मिळते. अश्या प्रकारे कॉफी व साखर मिळून आपल्या त्वचेला ऊर्जा मिळते त्याच बरोबर गुलाबपाणी मुळे त्वचेला पोषण देण्याचे काम होते. त्याच बरोबर त्वचेचे डेड सेल्स घालवण्यासाठी मदत मिळते. त्यामुळे आपली त्वचा 5-6 मिनिटात एकदम फ्रेश होऊन ताजी तवानी दिसू लागते.