पेढे म्हंटलेकी आपल्याला खवा किंवा मावा वापरुन बनवलेले पेढे डोळ्या समोर येतात. पेढे आपण देवाच्या पूजेसाठी किंवा प्रसाद म्हणून सुद्धा बनवू शकतो. तसेच इतर दिवशी किंवा सणवारच्या दिवशी सुद्धा बनवू शकतो.
गव्हाच्या पिठाचे पेढे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. तसेच त्याची टेस्ट सुद्धा मस्त लागते.
The Marathi language video Wheat Flour Kandi Pedha in Marathi can of be seen on our YouTube Channel of Gvhachya Pithache Kandi Pedhe
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 12 पेढे
साहीत्य:
1 कप गव्हाचे पीठ
½ कप पिठीसाखर किंवा बुरा शक्कर
4 टे स्पून साजूक तूप किंवा वनस्पती तूप
3 टे स्पून मिल्क पावडर
¼ टी स्पून वेलची पावडर
थोडेसे जायफळ पावडर
2 टे स्पून सजावटीसाठी बुरा शक्कर
कृती: प्रथम बुरा शक्कर बनवून घ्या. जर बुरा शक्कर नसेल तर पिठीसाखर बनवून घ्या.
एका नॉन स्टिक पॅनमध्ये गव्हाचे पीठ मंद विस्तवावर गुलाबी रंग यई पर्यन्त भाजून घ्या. गव्हाच्या पिठाला गुलाबी रंग आला की त्यामध्ये 2 टे स्पून साजूक तूप घालून मिक्स करून थोडेसे भाजून घ्या परत 1 चमचा तूप घालून परतून घ्या. व शेवटी 1 टे स्पून तूप घालून मिक्स करून त्यामध्ये मिल्क पावडर घालून परत थोडे परतून घ्या. मिल्क पावडरचा सुद्धा रंग बदलला पाहिजे. मग विस्तव बंद करून मिश्रण कोमट होऊ द्या.
गव्हाचे पीठ कोमट झालेकी त्यामध्ये पिठीसाखर किंवा बुरा शक्कर, वेलची पावडर, जायफळ पावडर घालून मिक्स करा व त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. मग एक गोळा घेऊन बुरा शक्करमध्ये घोळून घ्या. अश्या प्रकारे सर्व गोळे बनवून साखरेमध्ये घोळून घ्या. मग डब्यात भरून ठेवा.