आता समर सीझन म्हणजेच उन्हाळा सीझन चालू झाला आहे. आपण घराबाहेर पदो तर अगदी कडकडीत ऊन आपल्या स्कीनवर पडते त्यामुळे आपली स्कीन त्वचा टॅन होते म्हणजे काळी पडते. आपली टॅन झालेली त्वचा चांगली उजळ करण्यासाठी काही टॉप टिप्स आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. त्यासाठी काही फेस पॅक आहेत.
समरमध्ये आपण आपली टॅन झालेली स्कीन चांगली करण्यासाठी बाजारातील महागडे फेस पॅक वापरतो त्या आयवजी होम मेड फेस पॅक अगदी स्वस्त व मस्त बनवू शकतो. तसेच त्यामध्ये काही सुद्धा केमिकल नाहीत.
The Marathi language video Summer season skin care tips in Marathi can of be seen on our YouTube Channel of 5 Top Tips for skin in summer season
टॉप टिप्स फॉर स्कीन इन समर सीझन
1. मॅंगो फेस पॅक:
उन्हाळा आलाकी आंब्याचा सीझन चालू होतो. आपण आंब्याचे सेवन करतो. त्याच बरोबर आपण त्याच्या फेस पॅक बनवू शकतो. आंब्याचा रस काढून त्यामध्ये थोडेसे कोल्ड क्रीम व थोडेसे थंड दूध मिक्स करून त्याचे पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावर लावून 15 मिनिट तसेच ठेवावे मग साध्या पाण्यानी चेहरा स्वच्छ धुवावा.
2. वॉटरमेलन (कलिंगड) फेस पॅक:
कलिंगड म्हणजेच टरबूज ह्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याच्या सेवनाने आपले शरीर थंड राहते. आपल्या चेहऱ्याचे सौदर्य चांगले राहण्यासाठी टरबूजचा फेस पॅक तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावू शकतो. त्यासाठी टरबूजचा मधला भाग कापून त्याचा गर काढून त्यामध्ये दही मिक्स त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी 15-20 मिनिट तसेच चेहऱ्यावर ठेवून मग थंड पाण्यानि चेहरा धुवावा.
3. लेमन (लिंबू) फेस पॅक:
लिंबू उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खूप फायदेमंद आहे. लेमन फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील दाग धबे दूर होतात. मध व लिंबू रस मिक्स करून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी मग 30 मिनिट झाल्यावर चेहरा धुवावा.
4. किवी फेस पॅक:
आपल्याला किवी ही फळ माहिती असेलच ते खूप औषधी आहे त्याच्या सेवनाने बरेच फायदे होतात त्याच बरोबर त्याच्या आपल्या सौंदऱ्यासाठी उन्हाळ्यामध्ये खूप उपयोग सुद्धा होतो. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा त्याचा जूस काढावा मग त्यामध्ये मध व बदाम पेस्ट बनवून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी 15-20 मिनिट नंतर चेहरा स्वच्छ धुवावा.
5. काकडी फेस पॅक:
काकडी म्हणजेच कुकूंबर त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यामध्ये आपला चेहरा छान चमकदार राहण्यासाठी काकडीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावावा. काकडीची पेस्ट बनवून त्यामध्ये थोडीशी साखर व दही मिक्स करून चेहऱ्यावर लावावे 30 मिनिट नंतर चेहरा छान स्वच्छ पाण्यानि धुवावा.