ओठांच्या वर केस असले तर आपल्या चेहऱ्याच्या सौंदऱ्यामध्ये बाधा येते. आपण कितीही छान तयार होऊन मेकअप केला तर ओठाच्या वरच्या केसांमुळे आपल्याला अगदी बेचैन होते.
काही महिलांच्या ओठावर केस येतात. ते केस काढण्यासाठी त्यांना दर 15 दिवसांनी ब्युटि पार्लरमध्ये जाऊन केस थ्रेडिंग करून काढावे लागतात. त्यामुळे काहीवेळेस डाग सुद्धा पडतात.
मुली किंवा महिला आपण सुंदर दिसाव म्हणून बरेच प्रयत्न करीत असतात घरगुती उपाय करतात किंवा बाजारचे महागडे क्रीम सुद्धा आणून वापरतात त्यामुळे स्कीन सुंदर व चमकदार सुद्धा होते पण अप्पर लिप्स वर केस दिसले तर सगळा मूड बदलतो. काही जणी कायमचे अप्पर लिप्स वरील केस कायमचे काढण्यासाठी ट्रीटमेंट सुद्धा घेतात पण त्याचा परिणाम स्कीन वर होतो. किंवा काहीवेळेस इन्फेक्शन सुद्धा होते.
The Marathi language video Home Remedy to remove upper lip hair at home in Marathi can of be seen on our YouTube Channel of How to remove upper lips hair
जर आपण काही सोपे अगदी कमी खर्चाचे घरगुती उपाय केले तर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होणार नाहीत तसेच दर 15 दिवस नंतर पार्लरमध्ये सुद्धा जावे लागणार नाही. अप्पर लिप्स हेअर काढण्याचे घरगुती उपाय काय आहेत ते पाहूया.
अप्पर लिप्स हेअर काढण्याचे घरगुती उपाय:
दही, बेसन व हळद पेस्ट:
जर आपल्याला नॅच्युरल पद्धतीने अप्पर लिप्स वरचे केस काढायचे असतील तर दही, बेसन व हळद ह्याची पेस्ट बनवून लावावी त्यामुळे केस गळून पडतात तसेच टॅन झालेली स्कीन दूर होते. एंटीइंफ्लेमेटरी, एंटीमाइक्रोबियल और एंटीसेप्टिक आहे त्यामुळे आपल्या स्कीनसाठी चांगली आहे.
पेस्ट बनवण्यासाठी: 1 चमचा बेसन, 1 चमचा दही व एक चिमूट हळद मिक्स करून अप्पर लिपसवर लाऊन हलक्या हातानी रगडा मग 15 मिनिट तसेच ठेवा. 15 मिनिट झाल्यावर हळू हळू रगडून साफ करून थंड पाण्यानी धुवून काढा.
हळद व दूध पेस्ट:
ज्या मुली किंवा महिलांची पार्लरमध्ये जाऊन वैक्सिंग किंवा थ्रेडिंग करून ओठा वरचे केस काढायची इच्छा नसते त्यांनी हा सोपा घरगुती उपाय अगदी नैचरल करून पहा. दूध त्वचा चांगली ठेवते तर हळद हल्दी एंटीसेप्टिक आहे त्यामुळे ब्लीचिंग सुद्धा होते.
हळद व दूध पेस्ट बनवण्यासाठी 1 चमचा हळद व एक चमचा दूध पेस्ट करून ओठांच्या वरती लाऊन 30 मिनिट तसेच ठेवावे मग हातानी हळू हळू रगडून पेस्ट काढून मग मग पाण्याची स्वच्छ धुवावे.
लिंबू व साखर पेस्ट:
ओठांवरचे केस काढण्यासाठी लिंबुरस व साखर हा एक रामबाण उपाय आहे. लिंबुरस मध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टीज असते तर साखर मध्ये केस काढायची क्षमता असते. अश्या प्रकारची पेस्ट लावल्याने केस आपले आप निघून जातात. पण हा उपाय करताना अगदी सावधान पणे करा कारण की लिंबुरस मुळे आपल्या त्वचेला थोडी इजा होऊ शकते.
पेस्ट बनवण्यासाठी 1 चमचा लिंबुरस व 1 चमचा साखर पेस्ट बनवून अप्पर लिपसवर लावावी मग 15 मिनिट नंतर थंड पाण्यानी धुवावे.
मध व लिंबुरस पेस्ट:
अप्पर लिप्स वरचे केस काढण्यासाठी मध व लिंबुरस लावू शकता. लिंबुरस मध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टीज आहे तर मधमद्धे चिकटपणा आहे. त्यामुळे केस वैक्स होतात. त्यासाठी 1 टे स्पून मध, 1/2 टे स्पून लिंबुरस व 1/2 कप पाणी व एक कॉटनच्या कापडाचा तुकडा प्रथम मध व लिंबुरस मिश्रण बनवून घ्या मग पेस्ट अप्पर लिपसवर लावा 15-20 मिनिट झाल्यावर गरम पाण्यात कॉटनचे कापड भिजवून चांगले पिळून अप्पर लिप्स वर लावा मग हळुवारपणे खेचून काढा त्याने केस कापडाला चिटकून निघून येतील.
वरील सर्व उपाय घरगुती आहेत पण जाणकार व्यक्तीला विचरून करा.