कस्टर्ड पावडर आपल्याला माहिती आहेच. जे लोक अंड्याचे सेवन करत नाहीत त्यांनी कस्टर्ड सेवन करावे. कस्टर्ड पावडर अगदी कॉर्नफ्लोर सारखेच दिसते. ह्या मध्ये असा एक पदार्थ आहे त्यामुळे झटपट आपण कस्टर्ड बनवू शकतो.
आपल्याला माहिती आहे का की कस्टर्ड पावडर कश्या पासून बनवतात. कस्टर्ड पावडर बनवताना पिठीसाखर, कॉर्न स्टार्च, मिल्क पावडर, खाण्याचा पिवळा रंग, वनीला एसेन्स मिक्स करून बनवतात.
कस्टर्ड बनवताना आपण दूध साखर व कस्टर्ड पावडर मिक्स करून बनवतो व त्यामध्ये निरनिराळी फळ किंवा ड्राय फ्रूट वापरुन थंड करून सर्व्ह करतो. आता उन्हाळा आला की आपल्याला रोज जेवण झाल्यावर काहीना काही थंड खावेसे वाटते. म्हणून आपण रोज काही ना काही थंड पदार्थ बनवतो. त्यामध्ये कस्टर्ड ही एक मस्त डेझर्ट डिश बनवू शकतो.
कस्टर्ड बनवताना आपण आता जरा वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत. त्यामध्ये आपण सेवई वापरणार आहोत त्यामुळे त्याची टेस्ट अजून मस्त होणार आहे.
The Marathi language video Delicious Vermicelli ( Semiya) Fruit Custard in Marathi can of be seen on our YouTube Channel of Delicious Vermicelli Fruit Custard for Dessert
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
1 टे स्पून वर्मिसिली (सेवया)
½ टी स्पून तूप
2 कप दूध
2 ½ टे स्पून साखर
¼ टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून कस्टर्ड पावडर
½ कप दूध
10-12 काळी द्राक्ष (चिरून)
½ सफरचंद (चिरून)
3-4 चेरी
1 टी स्पून टूटी फ्रूटी
कृती: एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये सेवया घालून मिक्स करून 2 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये दोन कप दूध घालून मंद विस्तवावर 5 मिनिट उकळवून त्यामध्ये साखर घालून परत 2 मिनिट गरम करून घ्या.
एका बाउलमध्ये कस्टर्ड पावडर व ½ कप दूध मिक्स करून घ्या. मग टे मिश्रण हळू हळू गरम शेवयाच्या दुधाच्या मध्ये घालून मिक्स करून वेलचीपावडर घाला. आता 2-3 मिनिट मंद विस्तवावर मिश्रण शिजू घ्या. कस्टर्ड पावडर घातल्यावर हळू हळू मिश्रण लगेच घट्ट होऊ लागेल. आपल्याला मिश्रण फार घट्ट करायचे नाही थोडे पातळच ठेवायचे आहे जरूर भासली तर थोडे गरम दूध वापरले तरी चालेल. आता विस्तव बंद करून कस्टर्ड थंड करायला ठेवा.
कस्टर्ड थंड झाल्यावर त्यामध्ये सफरचंद व काळी द्राक्ष चिरून घाला किंवा आपल्याला हवी ती फळ चिरून घालून शकता. आता फळ मिक्स करून काचेच्या ग्लासमध्ये कस्टर्ड काढून त्यावर सफरचंद, द्राक्ष तुकडे घालून त्यावर चेरी व टुटी फ्रूटी ने सजवून 2 तास फ्रीजमध्ये थंड करून मग सर्व्ह करा.