आपण घर सजवण्यासाठी निरनिराळ्या फ्रेम किंवा पेंटिंग लावतो. त्यातिल काही फ्रेम अश्या असतात की त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जाऊन सुख शांती येते. पण फ्रेम लावताना योग्य दिशेला लावली तरच त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो म्हणजेच फायदेमंद ठरते.
घरामध्ये 7 घोडे असलेली तसवीर किंवा फ्रेम लावल्याने घरात सुख-समृद्धी, प्रसन्नता राहून सदैव लक्ष्मीचा वास राहील.
वास्तुशास्त्रा नुसार आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा आपल्या कामाच्या जागी 7 पळणारे घोडे किंवा उधळलेले घोडे असलेली तसवीर किंवा फोटो फ्रेम दक्षिण ह्या दिशेला लावल्याने आपल्या कामात गती येते. आपल्या घरात किंवा ऑफिसच्या जागी अश्या प्रकारची फ्रेम लावल्याने आपले त्या फ्रेमकडे सारखे लक्ष जाते व त्याचा असर आपल्या कामावर पडतो.
The Marathi language video Benefits of keeping 7 running horses painting at home in Marathi can of be seen on our YouTube Channel of Significance of 7 running horses painting
आपल्या ऑफिसमध्ये, घरात किंवा व्यवसायाच्या जागी 7 पळणाऱ्या घोड्यांची तसवीर लावल्याने आपल्या कामात प्रगती होऊन सफलता मिळते, व काम कारण्याची ताकत येते. तसेच पळणारे 7 घोडे व्यवसायाच्या प्रगतीसाठी सूचक मानले जाते. वास्तुशास्त्रा नुसार 7 हा आकडा सार्वभौमिक व प्राकृतिक आहे.
7 घोड्यांचीच का तसवीर किंवा फ्रेम लावावी व कोणत्या दिशेला लावावी?
7 घोड्यांचीच तसवीर लावावी कारणकी 7 हा नंबर सार्वभौमिक मानला जातो. म्हणजेच लग्नात आपण 7 फेरे मारतो, इंद्रधनुष्यमध्ये 7 रंग आहेत, सप्तऋषि तसेच 7 जन्म हा आकडा शुभ मानला जातो. म्हणूनच 7 घोडे ह्याची फ्रेम शुभ मानली जाते. तसेच आपल्या जीवनात धना संबंधीत जास्त चढ उतार होत नाहीत व सदैव लक्ष्मीचा वास राहतो.
अश्या प्रकारची फ्रेम लावताना घोड्याची तोंड घराच्या किंवा ऑफिसच्या आतील बाजूस पाहिजे व फ्रेम लावताना दक्षिण दिशेस लावावी. कारण की पळणारे घोडे हे प्रगतीचे प्रतीक आहे.
जर तुम्हाला कर्ज झाले आहे तर पश्चिम दिशेला आर्टिफिशियल घोड्याची जोडी ठेवावी. टे आपल्याला कोठे सुद्धा गिफ्ट शॉपमध्ये मिळेल. त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धीचा व लक्ष्मीचा सदैव वास राहील व आपल्या व्यवसायात नेहमी प्रगती होईल.
घोड्यांची फ्रेम घेताना नेहमी लक्षात ठेवा की घोड्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे, चिडलेला किंवा रागीट किंवा आक्रोश करणारी मुद्रा नसावी. खास करून पांढरे घोडे सकारात्मक ऊर्जाचे प्रतीक आहेत. म्हणूनच घरात किंवा ऑफिसमध्ये पांढऱ्या घोड्यांचीच फ्रेम लावावी त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जावून सकारात्मक ऊर्जा येते.
आपण घरात किंवा ऑफिसमध्ये फ्रेम लावतो पण नेहमी लक्षात ठेवा की कोणती सुद्धा फ्रेम तुटलेली नसावी किंवा फीकट झालेली नसावी किंवा वेगवेगळ्या दिशेला पळणारे घोडे नसावे.