आपण ह्या अगोदर ताजी कोथिंबीर कशी स्टोर करायची व फ्रेश मेथी सुद्धा कशी स्टोर करायची ते पाहिले. आता आपण फ्रेश टोमॅटो जास्त दिवस फ्रीजमध्ये कसे टिकवायचे ते पाहू या त्यासाठी आपल्याला अगदी सोपी ट्रिक वापरायची आहे. टोमॅटो स्टोर करताना किंवा साठवून ठेवताना आजिबात कुक करायचे नाही.
टोमॅटो आपल्याला स्वयंपाक करताना जास्त प्रमाणात लागतात कधी भाजी तर कधी आमटी मध्ये लागतात. काहीवेळेस काय होते की आपल्याला एखादी डिश बनवायची असते व टोमॅटो नसतात किंवा काही वेळेस टोमॅटो खूप महाग सुद्धा असतात. थंडीच्या सीझनमध्ये टोमॅटो स्वस्त होतात व उन्हाळा चालू झालाकी महाग होतात. तर मग आपण जेव्हा टोमॅट स्वस्त असतील तेव्हाच जर आपण स्टोर करून ठेवले तर पाहिजे तेव्हा आपल्याला वापरता येतात.
The Marathi language how to preserve tomatoes for long time at home in Marathi can of be seen on our YouTube Channel of tips for storing fresh tomatoes in refrigerator
आपण दोन पद्धतीने टोमॅटो कसे स्टोर करायचे ते पाहणार आहोत.
ताजे टोमॅटो घेऊन स्वच्छ धुवावे मग पुसून कोरडे करावे. टोमॅटोची खालची बाजू कापून घ्या. मग वरच्या बाजूनी टोमॅटोला अधिक चिन्हा सारखे कापा किंवा चीर द्या. मग टोमॅटो झिपलॉक बॅग मध्ये ठेवा. बॅग मधील हवा पूर्ण काढून झिप लाऊन डिप फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे तेव्हडा टोमॅटो काढून घ्या. त्याची साल म्हणजेच स्कीन काढून टाका. मग टोमॅटो चिरून भाजी किंवा आमटीमध्ये घालू शकता. बाकीचे राहिलेले टोमॅटो परत डिप फ्रीजमध्ये ठेवा.
अजून एक सोपी पद्धत म्हणजे टोमॅटो स्वच्छ धुवून, पुसून कोरडे करून घ्या. मग टोमॅटोचा खालचा भाग कापून घेऊन त्याचे चार उभे तुकडे कापून घ्या. अश्या प्रकारे सर्व टोमॅटो कापून घेऊन एका प्लेटमध्ये मांडून घ्या व त्यावर फॉईल पेपर लावून पूर्ण सील करून घ्या. आता ती प्लेट डीप फ्रीजमध्ये 8 तास ठेवा. मग प्लेट बाहेर काढून सर्व टोमॅटोच्या फोडी प्लॅस्टिक झिप लॉक बॅगमध्ये ठेवा. आता ती झिप लॉक बॅग डीप फ्रीजमध्ये ठेवून द्या. पाहिजे तेव्हा पाहिजे तितके टोमॅटो काढून परत बॅग डीप फ्रीजमध्ये ठेवा. टोमॅटोची साल काढून टोमॅटो वापरू शकता.
अश्या प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने टोमॅटो बरेच दिवस स्टोर करू शकतो.