मालपुवा ही स्वीट डिश खर म्हणजे राजस्थानी डिश आहे. प आता सर्व प्रांतात तो लोकप्रिय झाली आहे. आपण सणा वाराला किंवा इतर दिवशी सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवू शकतो. आपण मालपुवा ही डिश गुडी पाडवा ह्या सणाच्या दिवशी बनवू शकतो.
मालपुवा बनवताना खवा वापरतात तसेच दुधाची रबडी बनवून त्याबरोबर सर्व्ह करतात. पण आपण अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहू या. मालपुवा बनवताना खवा न वापरता मिल्क पावडर वापरली आहे. तसेच दुधाची रबडी न वापरता साखरेचा पाक वापरला आहे. तसेच वरतून ड्रायफ्रूटने सजवले आहे.
मिल्क पावडरचा मालपुवा चवीला खूप छान लागतो. तसेच मऊ लुसलुशीत लागतो. दिसायला सुद्धा आकर्षक दिसतो. कोणी पाहुणे आले तर अश्या प्रकारची डिश बनवायल मस्त आहे.
The Marathi language Gudi Padwaa Special Malpua in Marathi can of be seen on our YouTube Channel of Sweet Delecious Malpua without Khoya and Rabdi
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य: पुरीसाठी:
1 कप दूध + ½ कप दूध
3 टे स्पून मिल्क पावडर किंवा खवा
1 टी स्पून बडीशेप
1 कप मैदा
½ कप बारीक रवा
½ टी स्पून वेलची पावडर
तूप शालो फ्राय करण्यासाठी
पाक करिता:
1 कप साखर
½ कप पाणी
6-7 केसर काड्या
¼ टी स्पून वेलची पावडर
कृती: प्रथम एका बाउलमध्ये एक कप दूध व मिल्क पाउडर किंवा खवा मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये बडीशेप व मैदा घालून मिक्स करून मग त्यामध्ये रवा व वेलची पावडर घालून मिक्स करून झाकून 30 मिनिट बाजूला ठेवा. 30 मिनिट झाल्यावर त्यामध्ये ½ कप दूध घालून मिक्स करून मिश्रण एक सारखे करून घ्या.
पाक बनवण्यासाठी: साखर व पाणी मिक्स करून गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये केसर व वेलची पावडर घालून मिक्स करून थोडा चिकट असा पाक बनवून घेऊन बाजूला ठेवा.
नॉनस्टिक पण गरम करायला ठेवा त्याला थोडे तूप लावून घ्या. त्यावर 1 छोटा डाव मिश्रण घालून अगदी थोडेसे पसरून घ्या. बाजूनी परत थोडेसे तूप घाला व दोन्ही बाजूनी शालो फ्राय करून घ्या. अश्या प्रकारे सर्व पुऱ्या बनवून घ्या.
पाक थोडासा कोमट असताना त्यामध्ये बनवलेल्या पुऱ्या घालून 2-3 मिनिट पाकामध्ये ठेवा. मग पाकातून काढून एका प्लेटमध्ये ठेवा. वरतून ड्रायफ्रूट ने सजवून सर्व्ह करा.