पोहे म्हंटले की महाराष्ट्रातील लोकप्रिय कांदा पोहे किंवा बटाटा पोहे डोळ्यासमोर येतात.पोहे ही डिश लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वाना आवडतात. महाराष्ट्र मधील पोहे ही डिश प्रतेक प्रांतात बनवली जाते पण प्रतेक प्रांतात पोहे बनवण्याची पद्धत निराळी आहे. आपण नेहमी पारंपारिक पद्धतीने पोहे कांदा, बटाटा घालून बनवतो. पण आता आपण बिना कांदा बटाटा कसे बनवायचे ते पाहू या.
The Marathi language Soft Tasty Steamed Poha in Marathi can of be seen on our YouTube Channel of Different Style Steamed Pohe for Breakfast
आपण वाफवलेले पोहे बनवून बघा मस्त लागतात आपण ब्रेकफास्ट साठी किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर अश्या निराळ्या प्रकारचे पोहे बनवू शकतो. वाफवलेले पोहे बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
1 कप पोहे
¼ टी स्पून हळद
मीठ चवीने
लिंबुरस व साखर चवीने
फोडणीकरिता:
1 टे स्पून तेल
1 ½ टी स्पून मोहरी
1 ½ टी स्पून जिरे
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
8-10 कडीपत्ता पाने
सजावटीकरिता:
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
¼ कप फरसाण
2 टे स्पून बारीक शेव
कृती: प्रथम पोहे भिजवून चाळणीवर ठेवा. कोथिंबीर, हिरवी मिरची (चिरून) घ्या.
भिजवलेले पोहे एका पसरट चाळणीवर ठेवा. चाळणीच्या आकाराचे एक स्टीलचे भांडे घेऊन त्यामध्ये 2-3 ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यावर पोह्याची चाळणी ठेवून त्यावर एक झाकण ठेवा. लो मिडियम विस्तवावर पोहे 15 मिनिट वाफवून घ्या. 15 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करा.
एक छोट्या फोडणीच्या वाटीमद्धे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी-जिरे घालून तडतडलेकी त्यामध्ये चिरलेली मिरची व कडीपत्ता घालून फोडणी वाफवलेल्या पोह्यावर घाला. त्याच बरोबर पोह्यामद्धे साखर व लिंबुरस घालून मिक्स करून बाउलमध्ये काढून त्यावर फरसाण व शेव घालून सजवून सर्व्ह करा.