जगभर अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक आजारांसाठी फुलांच्या औषधांचा वापर केला जातो. शास्त्रज्ञाच्या मते फूल व पाने ह्याचा उपयोग मानसिक अवस्था व भावना च्या वर चांगला परिणाम होतो असे म्हणत. आज सुद्धा फुलांच्या व पानांच्या औषधाचा उपयोग करून स्वास्थ चांगले ठेवण्यास मदत होते. फुलाची औषधं वापरुन मेंदू, हृदय, डोळे, कान, पचन क्रिया ह्या वर त्याचा अनुकूल परिमाण होतो. आपण विचार केला तर पुष्प औषधी नॅच्युरल रेमिडीज चा एक पर्याय बनली आहे.
प्राकृतिक उपचार म्हणजेच नॅच्युरल रेमिडीज पद्धती:
पुष्प म्हणेच फूल आपण पहिली की आपले मन प्रफुलीत होते. तसेच त्याच्या सुगंधानी आपले मन प्रसन्न होते. तसेच फूल हे प्रमाचे प्रतीक आहे, सौन्दर्य आहे, भक्ति आहे व काव्य सुद्धा आहे. फुलांच्या सुगंधाची उपचार प्रणाली म्हणजे अरोमा थेरेपी म्हणतात.
The Marathi language Flower Remedies in Marathi can of be seen on our YouTube Channel of Pushpa aushadhi Flower Remedies
फुलांच्या औषधानचे प्रयोग:
कमळ:
कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे. दिसायला आकर्षक दिसते तसेच औषधी सुद्धा आहे. कमळ हे थंड चवीला मधुर तसेच कफ-पित दोष कमी करणारे आहे. कमळ हे हृदयाची शक्ति वाढवण्यास फायदेशीर आहे. म्हणजेच हृदयाची धडधड वाढली असता, हृदय अशक्त झाले असता कमळाच्या फुलांचे चूर्ण बनवून त्यामध्ये मध, लोणी व खडीसाखर मिक्स करून घेतल्याने उपयोगी पडते. तसेच स्त्रीयांसाठी सुद्धा हे मिश्रण उपयोगी आहे त्यामुळे अंगावरून जाणे थांबते.
केवडा:
केवडा ह्या फुलाचा सुगंध कस्तूरी सारखी मादक असते. केवडा हे फूल गुणकारी आहे. तसेच त्याला दुर्गधनाशक मानले जाते. डोके दुखी व गाठी झाल्याअसतील तर त्याचा अत्तराचा उपयोग होतो. कानाच्या दुखण्यामध्ये केवडा अत्तराचा उपयोग होतो.
गुलाब:
गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पुष्प औषधामध्ये गुलाबाचा उपयोग केला जातो. गुलाबाचा गुलकंद पोट, आतड्याची गरमी शांत करून हृदय स्वस्थ ठेवण्यास मदत होते.
चंपा:
चंपाची फूल वाटून कुष्ट रोगाच्या घावावर लावतात. ह्या फुलांचा अर्क रक्ताची कमी नष्ट करण्यास मदत करते. ह्या फुलांचे चूर्ण खाजेवर फायदेशीर आहे. तसेच पुरुषांना शक्ति मिळते.
झेंडू:
मलेरियाच्या डासांचा प्रकोप दूर करण्यासाठी झेंडूच्या फुलांची लागवड किंवा शेती नाली किंवा घराच्या आसपास करून त्याच्या वासानी मलेरियाचे डास पळून जातात. लिव्हरच्या रोगाची सूज किंवा चर्म रोगावर ह्याचा चांगला उपयोग होतो.
जास्वंदी:
जास्वंदीच्या फुलांचा संबंध गर्भाशयशी आहे. मासिक पाळी नंतर जास्वंदीच्या फुलांना तुपामध्ये भाजून महिला सेवन करू शकतात त्याने त्यांना लाभ होऊ शकतो. जास्वंदीची फूल चावून खालयाने तोंडातील छाले दूर होतात. ही फूल वाटून त्याचा लेप केसांवर लावल्याने टक्कल निघून जाते. जास्वंदी शीतवर्धक, वाजिकारक व रक्तशोधक आहे. ह्या फुलांचे सरबत हृदयाला प्रफुलीत ठेवून ते रुचकर लागते.
कडूलिंब:
कडूलिंबाच्या फुलांना वाटून त्याचा लगदा फोड-फुंसी वर लावल्याने जळजळ व गरमी दूर होते. शरीरावर त्याचा लेप लावून मालीश केल्यास फायदेशीर होते. जर कडूलिंब फूल वाटून गाळून त्यामध्ये मध मिक्स करून सेवन केल्यास वजन कमी होते. कडीलिंबाची फूल खूप औषधी आहेत म्हणूनच त्याला घरचा वैद्य असे म्हणतात.
जुई:
जुईच्या फुलांचे चूर्ण अथवा गुलकंद अम्लपित्त नष्ट करून पोटातील अल्सर दूर करते. पुष्प औषधी मध्ये जुईची फूल महत्वपूर्ण मानली जातात. तर अश्या प्रकारे पुष्प औषधी वापरुन आपण आपल्या शारीरिक व्याधी कमी करू शकतो.
प्लीज सेंड डिटेल अँड कॉन्टॅक्ट नंबर प्लीज