आपण आपल्या दिवसाची सुरवात चहा घेऊन करतो त्यामुळे आपल्याला ताजे तवाने वाटते. तसेच आपला मेंदू तल्लख राहतो. भारतात चहाचे शौकीन खूप आहेत. आपल्या कडे घराबाहेर पडले की ठीक ठिकाणी चहाच्या गाड्या पहायला मिळतात.
काळा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे (हृदय, डायबीटीज, रोग प्रतिकारशक्ति, हाडांची मजबूती, पचनशक्ति, टेंशन, ब्लड प्प्रेशर, कोलेस्ट्रॉल ह्यासाठी फायदेमंद)
The Marathi Black Tea Benefits in Marathi can of be seen on our YouTube Channel of Black Tea Benefits For Heart, Diabetes, Immunity, Bones, Tension, Blood Pressure
आपण चहा बनवतो तेव्हा आपण दूध, साखर व चहा पावडर बनवून चहा बनवतो. पण आपण काळा चहा घेतला आहे का त्याचे खूप औषधी गुणधर्म आहेत. तसेच तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह सुद्धा आहे. काळा चहा म्हणजे त्यामध्ये दूध व साखर न घालता बनवला जातो. काळा चहा ह्याचे फायदे आपण पहाणार आहोत. त्याच बरोबर काळा चहा आपली त्वचा व केस ह्यासाठी सुद्धा फायदेमंद आहे. आपल्या कडे काळा चहा पिणारे शौकीन सुद्धा बरेच आहेत.
काळा चहा पिण्याचे फायदे:
काळा चहा पिणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्यामुळे आपली मानसिक क्षमता सुद्धा चांगली राहते. काळा चहा सेवन केल्याने डोके दुखी, ब्लडप्रेशर, हार्ट अटॅक, हाडांचे दुखणे तसेच पार्किंसंस रोग ह्यावर गुणकारी आहे.
1. हृदयच्या आरोग्यासाठी लाभदायक:
काळ्या चहामध्ये हृदय संबंधीत तक्रारी दूर करण्याची क्षमता आहे. काळ्या चहामध्ये एंटीऑक्सीडेंट गुण आहेत त्यामुळे हृदयाशी जोडल्या जाणाऱ्या रक्त वाहिन्या स्वस्थ राहतात. काळा चहा रोज नियमित सेवन केल्याने आपले हृदय अगदी स्वस्थ राहते. पण त्याच बरोबर आपला डॉक्टरि इलाज चालू ठेवला पाहिजे. डॉक्टरना विचारले पाहिजे की रोज किती वेळा काळा चहा सेवन करावा.
2. डायबीटीज सुद्धा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते:
डायबीटीज मध्ये ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी काळा चहा फायदेशीर आहे कारणकी त्यामध्ये एंटीडायबिटिकचे गुण आहेत. ह्यामध्ये इंसुलिन प्रमाण कमी होऊन साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
3. रोग प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते:
आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते. पण प्रतेक व्यतीची प्रकृती निराळी असते त्यामुळे प्रतेकला ह्याचा फायदा होईलच असे नाही.
4. हाडांची मजबूती टिकून राहते:
तज्ञाच्यानुसार काळा चहा सेवन केल्याने हाडांची कमजोरी दूर होण्यास मदत होते. तसेच त्यामुळे ओस्टियोपोरेसिस सारख्या समस्या पासून वाचू शकतो.
5. पचन शक्ति चांगली राहते:
काळा चहा सेवन केल्याने पचनशक्ति चांगली राहण्यास मदत होते. कारणकी त्यामध्ये कैटेचिन नावाचे तत्व आहे. त्यामुळे पचनशक्ति चांगली राहते.
6. कोलेस्ट्रॉल कमी करते काळा चहा:
काळ्या चहाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो. पण त्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
7. टेंशन कमी करण्यासाठी काळा चहा फायदेमंद:
काळ्या चहाच्या सेवनाने टेंशन कमी होण्यास मदत होते.
8. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते काळा चहा:
काळा चहा ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते: ब्लड प्रेशर कमी करायचे असेल तर दिवसभरात 2-3 कप काळा चहा सेवन करावा. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुद्धा चांगले राहते.