आपण आंब्या पासून अजून एक छान रेसीपी पाहणार आहोत. आंब्याचे रोल चवीला खूप छान लागतात. आपण डेझर्ट म्हणून किंवा जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. आंब्याचे रोल बनवायला अगदी सोपे अ झटपट होणारे आहेत बनवून पहा नक्की सर्वाना आवडतील.
आंब्याचे रोल बनवताना मावा किंवा खवा किंवा दूध वापरले नाही. अगदी नवीन प्रकार आहे.
The Marathi Mango Roll can of be seen on our YouTube Channel of Mango Mithai Roll No Khoya No Milk
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 9 रोल बनतात
साहीत्य:
1 कप आंब्याचा रस
1 कप बेसन
2 टे स्पून तूप
½ कप साखर
¼ टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून मिल्क पावडर
बदाम काजू सजावटीसाठी
कृती: आंब्याचा रस मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या.
नॉन स्टिक पॅनमध्ये 1 टे स्पून तूप गरम करून घ्या. तूप गरम झालेकी त्यामध्ये बेसन घालून मिक्स करून मंद विस्तवावर छान खमंग भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यावर बाजूला काढून ठेवा.
त्याच पॅनमध्ये ब्लेंड केलेला आंब्याचा रस व साखर मिक्स करून साखर पूर्ण विरघळल्यावर त्यामध्ये भाजलेले बेसन घालून घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. मिश्रण घट्ट झालेकी विस्तव बंद करा. मिश्रण थोडेसे थंड होऊ द्या. मग त्यामध्ये मिल्क पाऊडर व वेलची पावडर घालून मिक्स करून त्याचे छोटे छोटे रोल बनवून वरतून काजू बदाम तुकडे लावून सजवून सर्व्ह करा.