असे म्हणतात की आपले शरीर स्वस्थ असेल तर आपले मनसुद्धा स्वस्थ राहते. त्यावर आपले रोजचे काम व आपली जीवन शैली अवलंबून असते. आपली तब्येत बरी नसली की आपण लगेच डॉक्टरचा सल्ला घ्यायला जातो. पण प्रतेक वेळी सल्ला घायला पाहिजे असे नाही. आपण काही जरुरीच्या गोष्टी लक्षता ठेवून केल्या तर आपल्या जीवनावर त्याचा चांगला परिणाम होतो व आपले शरीर स्वस्थ राहते.
The Marathi Amazing Vastu Tips For Health can of be seen on our YouTube Channel of Amazing Vastu Tips For Health
आपण आपल्या रोजच्या जीवनात काही वास्तु टिप्स लक्षात ठेवून केल्यातर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. आज आपण काही वास्तु टिप्स बघणार आहोत. त्याचा चांगला उपयोग आपल्याला होणार आहे.
1. दुपारच्या वेळेस सूर्याची अल्ट्रावायलेट किरणे येतात त्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्या किरणा पासून वाचण्यासाठी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या खिडक्या व दारे बंद ठेवावी. कारण की अश्या प्रकारची किरणे आपल्या शरीराला हानिकारक आहेत.
2. सकाळच्या वेळेस सूर्याची कोवळी किरणे आपल्या शरीरावर पडणे लाभदायक असतात. त्यामुळे शरीरातील हानिकारक बैक्टीरिया नष्ट होतात. आपण सकाळी लवकर उठून पूर्व दिशेला असणाऱ्या खिडक्या व दारे उघडी ठेवावीत. त्यामुळे सूर्य देवाचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो.
3. आपल्या घराचे मुख्य दार पश्चिम किंवा दक्षिण – पश्चिम अथवा नैऋत्य दिशेला असेल तर ते अशुभ असून आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे कारण की ह्या दिशेनि येणारी किरणे दुष्टित असतात तर आपल्याला त्या किरणा पासून वाचले पाहिजे.
4. घराची गॅलरी पश्चिम दिशेला असेल तर घरातील पुरुषाचे स्वास्थ चांगले रहात नाही. ते नेहमी आजारी राहून त्यांचे कामात लक्ष रहात नाही. वास्तु शास्त्र नुसार घराची गॅलरी उत्तर दिशेला असावी म्हणजे घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहून रोग होण्यापासून बचाव होतो.
5. गर्भवती महिलांनी नेहमी दक्षिण- पश्चिमच्या खोलीमध्ये रहायला पाहिजे. अश्या स्थितीत ईशान्य किंवा अग्नेय दिशेच्या खोलीत नाही राहायला पाहिजे. कारण की त्यामुळे गर्भाशय संबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात. तसेच नवीन जन्म झालेल्या बाळाला पूर्व दिशेला असणाऱ्या खोलीमध्ये ठेवणे लाभदायक आहे. तसेच झोपताना बाळाचे डोके पूर्व दिशेला पाहिजे.
6. एक महत्वाची गोष्ट म्हणजे झोपायची खोली नेहमी खुली व हवेशीर पाहिजे. असे म्हणतात की त्यामुळे मानसिक तनाव व नर्वस सिस्टम संबंधित रोग होत नाहीत. त्याच बरोबर ब्लड प्रेशर योग्य राहते. जर ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकानी दक्षिण-पूर्व च्या दिशेला असणाऱ्या खोलीमध्ये राहू नये. कारणकी ही दिशा अग्नि तत्ववर आधारित आहे त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते.
7. उत्तर दिशेला डोके करून झोपू नये त्यामुळे उत्तर ध्रुव व मनुष्य ह्याचे डोके विकसित होऊन अनिद्रा किंवा झोप न येणे हा रोग होऊन शरीर हळूहळू कमजोर होऊ शकते. जर दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपले तर असे कोणते सुद्धा रोग होत नाहीत.
8. देवघरात खंडित झालेली मूर्ती किंवा फोटो स्वास्थ संबंधित परेशानी होऊ शकते. जर घरात खंडित मूर्ती असेलतर ती नदीमध्ये विसर्जित करावी. नेहमी दक्षिण दिशेला पंचमुखी बालाजीचा फोटो लावावा.
9. ईशान्य दिशेला जर तुळशीचे रोप असेलतर स्त्रीयांचे आरोग्य ठीक रहात नाही. ती नेहमी आजारी राहते. त्यामुळे घरातील सुख शांती नष्ट होते. म्हणून तुळशीचे रोप नेहमी पश्चिम या दिशेला पाहिजे. त्यामुळे घरातील स्त्रीचे आरोग्य नेहमी चांगले राहून शांती राहते.
10. वास्तु शास्त्र नुसार घरातील भिंतीवर किंवा सीलिंग वर भेगा पडल्या असतील तर घरात नकारात्मक ऊर्जा येऊन अशांती राहते. स्कीन व श्वसन संबंधीत आजार होऊ शकतात.
11. वास्तु शास्त्र नुसार जेवण करताना आपले तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला पाहिजे. म्हणजे आपले आरोग्य चांगले राहते.