रवा व बेसन थोडेसे भाजून थंड करून मग डब्यात भरून ठेवले तर किडे होत नाहीत.
मैदा, रवा, बेसन किंवा पिठ (Wheat Flour or Rice Flour) आपल्या भारतात घरोघरी असतेच. आपण त्यापासून नाश्तासाठी भजी, किंवा चपाती, पराठा, फुलका बनवण्यासाठी वापरतो. मुलांसाठी हलवा किंवा पुरी बनवण्यासाठी वापरतो. पण आपण त्याची योग्य काळजी घेऊन साठवणूक केली तर त्यामध्ये किडे होऊन आपले नुकसान होत नाही व आपल्याला पाहिजे तेव्हा वापरुन पदार्थ बनवता येतात. पावसाळ्याच्या सीझनमद्धे बहुतेक करून किडे होतातच. त्यासाठी काही खास टिप्स आहेत त्या आपण आचरणात आणल्या तर आपल्याला परेशानी होऊ शकत नाही.
The Marathi How to Store Maida, Suji, Besan & Flour For Long Time Tips can of be seen on our YouTube Channel of Tips & Tricks for storing Suji, Maida, Flour & Besan
तमालपत्र (Bay Leaf) किंवा कडूलिंबाची पान:
तमालपत्र (Bay Leaf) किंवा कडूलिंबाची पान रवा, मैदा किंवा बेसन च्या डब्यात घालून ठेवल्यास किडे होत नाहीत. ते किडयान पासून वाचवतात त्याच बरोबर पिठातील आदरता कमी करतात.
हवाबंद डब्बा:
मैदा, बेसन, रवा, किंवा आटा ह्यांना किडे लागण्या पासून वाचवण्यासाठी हवा बंद डब्यात ठेवा किंवा काचेच्या बरणीत ठेवा किंवा जाड प्लॅस्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवा. म्हणजे किडे लागणार नाहीत.
रेफ्रिजरेटिंग:
आपल्याला रवा, मैदा, बेसन बरेच दिवसासाठी साठवून ठेवायचे असेल तर त्यांना फ्रीजमद्धे ठेवावे. त्यामुळे त्यात किडे नहोता बरेच दिवस चांगले राहतात.
पुदिनाची पाने:
रवा, बेसन ह्यांना जास्त दिवस चांगले टिकवून ठेवावचे असेलतर त्यामध्ये पुदिनाची सुकलेली पाने ठेवावी त्यामुळे त्याच्या वासानी किडे होत नाहीत.