भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी 10 फायदे
बदाम सेवन करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. आपण आपल्या रोजच्या दिवसभराच्या दिनचर्यामध्ये 4 भिजवलेले बदाम सेवन करणे शमिल करून घेतले पाहिजे. प्रोटीन युक्त असलेले बदाम त्यामध्ये फाईबर, ओमेगा 3 आहे. तसेच बदाम सर्वाना आवडतात. पण लोकांमध्ये कंफ्यूजन आहे की कच्चे बदाम खावे की भिजवलेले बदाम सेवन करणे जास्त फायदेशीर आहे. आपण पाहणार आहोत की कच्चे बदाम सेवन करावे की भजवलेले बदाम सेवन करणे जास्त फायदेशीर आहे.
The Marathi Health Benefits of Soaked Almonds can of be seen on our YouTube Channel of Health Benefits of Soaked Almonds
काहीजण पूर्ण रात्र पाण्यात बदाम भिजत ठेवतात. आपण 5-6 तास बदाम पाण्यात भिजत घातले तरी चालतात. कच्चे बदाम सेवन करण्याच्या एवजी भिजवलेल बदाम सेवन करणे जास्त फायदेशीर आहे. कारणकी भिजवलेले बदाम मऊ व पचायला हलके असतात. भिजवलेले बदाम साल काढून सेवन करावे कारणकी बाहेरील आवरणामध्ये एक एंजाइम असते ते पचन क्रिया प्रभावित करते. एक व्यक्ति दिवसांत 8-10 बदाम खाऊ शकते.
भिजवलेले बदाम सेवन करण्याचे फायदे:
पचनशक्ती चांगली राहते:
कच्या बदाम पेक्षा भिजवलेले बदाम एंजाइम सोडण्यास मदत करते त्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. बदाम एक हेल्दी स्नॅक्स आहे. बदाममध्ये मोनोसैचुरेटेड फैट्स आहेत त्यामुळे त्याच्या सेवनाने भूक लवकर लागत नाही व पोट भरल्या सारखे वाटते. त्यामुळे शरीराचे वजन सुद्धा वाढत नाही.
कोलेस्ट्रॉल योग्य ठेवते:
बदाम भजवून खाल्याने हृदय हेल्दी राहून खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.
शरीराचे वजन वाढणे कमी होते:
बदाम भिजवून सेवन केल्याने बदाममध्ये असणारे विटामिन ई एक एंटीऑक्सीडेंटचे काम करते. त्यामुळे त्यामधील तत्व आपले वय वाढलेले दिसत नाही व अंगावरील सूज कमी करते.
भिजवलेले बदाम सेवन करणे जास्त फायदेशीर:
बदाम नेहमी भिजवून सेवन करावे करणकी त्याचा सालीमध्ये म्हणजेच आवरणामद्धे टैनिन आहे जे पोषक तत्व रोकते. तसेच बदाम भजवलेकी त्याचे साल नीट निघते व बदाम मधील पोषक तत्व आपल्याला नीट मिळतात.
प्रेगनेंसी मध्ये बदाम सेवन करणे फायदेशीर:
गर्भवती महिलांनी भिजवलेले बदाम सेवन करणे फायदेशीर आहे त्यामुळे त्यांची व बाळाची तबेत चांगली राहून पूर्ण न्यूट्रीशन मिळते.
मेंदूचे आरोग्य चांगले राहते:
डॉक्टरच्या म्हणण्या नुसार रोज 4-6 बदाम सेवन केले तर आपली स्मरणशक्ती चांगली राहते. तसेच आपली सेंट्रल नर्वस सिस्टम चांगले काम करते. त्यामुळे दिमाग स्वस्थ राहते.
हार्टच्या आरोग्यासाठी चांगले:
भिजवलेल्या बदाममध्ये प्रोटीन, पोटैशियम व मैग्नीशियम आहे ते आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते. त्याच बरोबर त्यामध्ये खूपसारे एंटी-आक्सीडेंट गुण आहेत. त्यामुळे हार्टच्या रोगांपासून बचाव होतो.
ब्लड प्रेशर नियंत्रित राहते:
भिजवलेल्या बदाममध्ये जास्त पोटैशियम आहे तर सोडियमची मात्रा कमी आहे त्यामुळे ब्लडप्रेशर योग्य राहून हृदयासंबंधित तक्रारी कमी होतात. त्याच बरोबर त्यामध्ये असणारे मैग्नीशियम त्यामुळे रक्ताचा प्रवाह नीट सुरळीत राहतो.
इम्यून सिस्टम मजबूत राहते:
भिजवलेल्या बदाममध्ये प्री-बायोटिक गुण आहेत जे आपल्या इम्यून सिस्टमला मजबूत बनवते. प्री-बायोटिक गुण असल्यामुळे आतडयामधील असणारे गुड बैक्टीरिया वाढवण्यास मदत करते त्यामुळे बऱ्याच रोगापासून आपला बचाव होतो.
भिजवलेले बदाम सेवन केल्यामुळे रक्त शुद्ध होऊन केस गळणे थांबते. हाडे व दात बळकट होतात व स्कीन संबधित तक्रारी कमी होतात.