वास्तु शास्त्र ज्योतिष शास्त्र नुसार कापुरचे 10 चमत्कारी उपाय
आपल्याला कापूर परिचयाचा आहे. आपण देवाची आरती करतो तेव्हा कापूर लावतो त्यामुळे वातावरण शुद्धी होते व त्याचा छान सुगंध येतो व त्याच बरोबर आपले मन व डोके शांत राहते.
वास्तुशास्त्र व ज्योतिष शास्त्रमध्ये कापूरचे महत्व बरेच आहे. कापूर औषधे बनवतात सुद्धा वापरतात. तुम्हाला माहिती आहे का कापूरमुळे आपण संकटा पासून दूर जाऊ शकतो व आर्थिक प्राप्ती सुधारते व त्याच बरोबर वास्तुदोष नष्ट होतो.
The Marathi Astrological Home Remedies Benefits of Camphor can of be seen on our YouTube Channel of Astrological Home Remedies Benefits of Kapoor
आता आपण पाहू या कापूरचे चमत्कार काय आहेत.
पुण्य प्राप्ती होते: घरामध्ये कापूर जाळण्याची परंपरा फार जुनी आहे. शास्त्रानुसार देव व देवी समोर कापूर जाळण्याने पुण्य मिळते. म्हणून रोज संध्याकाळी दिवे लागणेच्या वेळी घरात देवासमोर कापूर जाळावा.
पितृदोष व कालसर्पदोष पासून मुक्ति मिळते: कापूर जाळल्याने देवदोष व पितृदोष असेल तर शांत होतो. बऱ्याच लोकांची तक्रार असते की आम्हाला बहुकेत करून पितृदोष किंवा कालसर्पदोष आहे. खरम्हणजे तो राहू व केतूचा प्रभाव आहे. त्यासाठी वास्तुदोष ठीक करायला पाहिजे.
जर वास्तु दोष ठीक करू शकत नसाल तर रोज सकाळ, संध्याकाळ व रात्री तुपात कापूर भिजवून घरात जाळावा. त्याच बरोबर बाथरूम व टॉयलेटमध्ये 2-2 कापूर वडी ठेवावी.
अचानक दुर्घटना पासून बचाव: अचानक दुर्घटनाचे कारण राहू, केतू व शनि आहे. त्याच बरोबर आपला राग हा सुद्धा दुर्घटनासाठी कारणीभूत आहे. म्हणून रोज रात्री हनुमान चालीसाचे वाचन करून कापूर जाळावा.
रोज सकाळ-संध्याकाळ घरात कापूर जाळण्याने अचानक दुर्घटनाचे प्रकार होत नाहीत. रात्री झोपताना कापूर जाळणे खूप फायदेशीर आहे.
सकारात्मक ऊर्जा व शांती: घरात जर सकारात्मक ऊर्जा व शांती पाहिजे असेलतर रोज सकाळ-संध्याकाळ तुपात कापूर भिजवून जाळून पूर्ण घरात फिरवावा. अश्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व वाईट स्वप्न येत नाहीत व शांती राहते. त्याच बरोबर जाळलेल्या कापूरच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू व काही रोग पासरण्या पासून बचाव होतो व वातावरण शुद्ध होऊन रोग होत नाहीत.
अचानक धानप्राप्तीचा उपाय: सकाळी गुलाबाच्या फुलामद्धे कापूर ठेवून संध्याकाळी त्यातील कापूर जाळून ते फूल दुर्गामाताला अर्पण करावे. त्यामुळे आपल्याला अचानक धनप्राप्ती होते. पण आपल्याला हे 43 दिवस नियमित करायचे आहे. अश्या प्रकारचा उपाय नवरात्रीमध्ये केला तर जास्त फायदेशीर आहे.
वास्तुदोष नष्ट करण्यासाठी: जर घरात कोणत्या जागी वास्तु दोष निर्माण होत असेल तर त्या जागी 2 कापुरच्या वड्या ठेवाव्या जेव्हा त्या कापूरच्या वड्या संपून जातील तेव्हा परत दुसऱ्या ठेवाव्या. असे केल्याने त्या भागातील वास्तुदोष नष्ट होईल.
पति-पत्नी मधील तनाव दूर करण्यासाठी: रात्री झोपताना पत्नीने पतीच्या उशीच्या खाली सिंदूरची पुडी ठेवावी व पतीने पत्नीच्या उशीच्या खाली 2 कापूर वड्या ठेवाव्या. सकाळी उठल्यावर सिंदूर घराच्या बाहेर चांगल्या ठिकाणी टाकावा व कापूर बेडरूममध्ये जाळावा. जर असे करायचे नसेलतर रोज बेडरूममध्ये कापूर जाळावा व कोपऱ्यात 2 कापूरच्या वड्या ठेवाव्या त्या संपल्याकी दुसऱ्या ठेवाव्या.
धनवान बनण्यासाठी: रोज रात्री स्वयंपाक घर आवरून झाल्यावर चांदीच्या वाटीत कापूर जाळावा त्यामुळे धन-धान्यने आपले घर नेहमी भरून राहील. कधी काही कमी पडणार नाही.
विवाह हेतु: विवाहमध्ये येणाऱ्या बाधा दूर करण्यासाठी एक सटीक उपाय आहे. 36 लवंग व 6 कापूरचे तुकडे घेऊन त्यामध्ये हळद व तांदूळ घालून दुर्गामाताला त्याची आहुति द्या.
टीप: जर आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळणे शक्य नसेलतर दर शनिवारी व अमावस्या व पूर्णिमा ह्या दिवशी संध्याकाळी घरात कापूर जाळावा त्यामुळे घरात सुख-शांती राहते.