कुरकुरीत कोबीची भजी व शिमला मिरचीची भजी ढोबळी मिरची भजी
आता पावसाळा हा सीझन चालू आहे. बाहेर पाऊस पडत असला की आपल्याला गरम गरम चहा किंवा कॉफी प्यायची तलफ येते. मग बाल्कनीत बसून गरम गरम चहा किंवा कॉफी बरोबर मस्त पैकी गरम गरम भजी तर हवीच.
The Marathi Tasty Crispy Kobichi Bajji & Shimla Mirchichi Bajji can of be seen on our YouTube Channel of Crispy Capsicum Pakora & Cabbage Pakora
आपण ह्या अगोदर कांदा भजी किंवा बटाटा भजी किंवा मुगाच्या डाळीची भजी कशी बनवायची ते पाहिले. आता आपण कोबीची भजी व शिमला मिरचीची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. हे भजाचे दोन्ही प्रकार मस्त लागतात तसेच ते छान कुरकुरीत सुद्धा होतात.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य: कोबीची भजी:
2 कप कोबी (पातळ उभा चिरून)
1 मध्यम आकाराचा कांदा (उभा पातळ चिरून)
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
½ टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून हळद
¼ टी स्पून हिंग
1 टी स्पून ओवा (चोळून)
7-8 कडीपत्ता पाने (चिरून)
3 टे स्पून बेसन
1 टे स्पून तांदळाचे पीठ
1 टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
तेल भजी तळण्यासाठी
साहीत्य: शिमला मिरचीची भजी:
2 मध्यम आकाराच्या शिमला मिरची
1 टी स्पून व्हेनिगर
¼ टी स्पून मीठ शिमला मिरचीला लावण्यासाठी
½ कप बेसन
1 टे स्पून तांदळाचे पीठ
1 टी स्पून लाल मिरची
¼ टी स्पून हळद
¼ टी स्पून हिंग
1 टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
तेल भजी तळण्यासाठी
कृती: कोबीची भजी:
प्रथम कोबी उभा पातळ चिरून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची बारीक चिरून किंवा कुटून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
एका बाउलमध्ये चिरलेला कोबी, कांदा, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, बेसन, तांदळचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद हिंग, कडीपत्ता, ओवा, मीठ व गरम तेल घालून चांगले मिक्स करून पाणी आजिबात घालायचे नाही.
कढईमध्ये तेल गरम करून छोटी छोटी भजी तेलात घाला भजी घालताना मिश्रण दाबून घालू नका. मग दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत भजी तळून घेऊन प्लेट मध्ये काढून घ्या.
कृती: शिमला मिरचीची भजी:
शिमला मिरची धुवून पुसून घ्या. मग त्याचे उभे चार तुकडे कापून घ्या. मग त्यावर व्हेनिगर व थोडेसे मीठ घालून बोटानि एकसारखे करून घेऊन 5 मिनिट तसेच बाजूला ठेवा.
एका भाड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ चवीने, गरम तेल घालून मिक्स करून लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून चमचानी मिक्स करून घ्या. मिश्रण चमचानी चांगले फेटून घ्या. मग त्यामध्ये चिरलेली शिमला मिरची घालून सर्व शिमला मिरचीला मिश्रण लाऊन घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून बेसनमध्ये बुडवलेली शिमला मिरची गरम तेलात घालून विस्तव मध्यम ठेवा. मग दोन्ही बाजूनी भजी छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम भजी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.