कुरकुरीत टेस्टि न्यूट्रिशियस भजी बिना बेसन बिना तांदळाचे पीठ अगदी नवीन प्रकार
भजी हा पदार्थ म्हंटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मग ती कोणत्या सुद्धा प्रकारची असो. आता पावसाळा सीझन चालू आहे. मग दुपारी चहा बरोबर आपण मस्त पैकी खमंग कुरकुरीत भजी सर्व्ह करू शकतो. जरी पावसाळ सीझन नसला तरी आपण इतर वेळी सुद्धा किंवा सणवाराला किंवा पाहुणे येणार असतील तर भजी बनवतो किंवा आपण जेव्हा शिरा बनवतो तेव्हा त्याच्या बरोबर भजी ही बनवतोच.
The Marathi Nutritious Tasty Crispy Bhaji Pakora Pakoda without Besan New Recipe can of be seen on our YouTube Channel of Nutritious Tasty Crispy Bhaji Pakora Pakoda
आपण ह्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारची भजी कशी बनवायची ते पाहिले आता आपण अजून एक नवीन प्रकारची भजी बनवणार आहोत.
नवीन प्रकारची भजी पौस्टिक आहेत कारण की आपण बेसन किंवा तांदळाचे पीठ वापरणार नाही. खूप मस्त आहेत तुम्ही सुद्धा बनवून पहा.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
1 कप मोड आलेले मूग
1 मोठ्या आकाराचा बटाटा (धुवून, सोलून व किसून)
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची कुटून
½ टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून मिरे पावडर
½ टी स्पून बडीशेप कुटून
¼ कप पालक (धुवून चिरून)
1 टे स्पून कोथिंबीर (धुवून, चिरून)
मीठ चवीने
1 टे स्पून तेल (गरम करून)
तेल फ्राय करण्यासाठी
कृती:
प्रथम मुगाला मोड आणून घ्या. पालक स्वच्छ धुवून चिरून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. बटाटा धुवून सोलून किसून परत दोन पाण्यात धुवून घ्या. म्हणजे छान पांढरा स्वच्छ होईल. पालक धुवून चिरून घ्या. मिरे व बडीशेप कुटून घ्या.
प्रथम मोड आलेले मूग मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका बाउलमध्ये वाटलेले मूग, किसलेला बटाटा, आल-लसूण-हिरवी मिरची, पालक, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, मिरे पावडर, मीठ व गरम तेल घालून मिक्स करून घ्या.
कढईमध्ये तेल गरम कर त्यामध्ये छोटी छोटी गोल भजी घालून मध्यम विस्तवावर दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम भजी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.