विवाहित महिला लग्नानंतर का करतात शृंगार किंवा शृंगार करण्याचे महत्व
हिंदू धर्मामध्ये विवाहित महिला शृंगार करतात त्याचे महत्व खूप आहे.
The Marathi After Marriage Why Do Married Ladies Make Shringar can of be seen on our YouTube Channel of After Marriage Why Do Married Ladies Make Shringar
हिंदू धर्मात लग्न झाल्यावर महिला शृंगार करतात व ते करणे सुद्धा खूप जरुरीचे आहे. त्याच्या मागे काही धार्मिक कारण सुद्धा आहेत. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे पतीचे आरोग्य चांगले राहून दीर्घ आयुष्य प्राप्त होते. त्याच बरोबर वैवाहिक जीवन आनंदी व सुखी होते. धार्मिक कारण जशी आहेत त्याच बरोबर वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत. त्यासाठी शृंगार का करायचा व कोणकोणते शृंगार आहेत व त्याच्या पासून काय लाभ मिळणार आहेत ते पाहिले पाहिजे. काही शृंगार असे आहेत की फक्त विवाहिक महिलाच करू शकतात. काही शृंगार विवाहिक महिला किंवा लग्न न झालेल्या मुली किंवा पुरुष सुद्धा करू शकतात.
आता आपण पाहू या महिलांचे 16 शृंगार काय आहेत.
बिंदी (कुंकू) :
बिंदी लावल्याने चेहऱ्यावर तेज येते. जेथे आपण बिंदी लावतो तो भाग भगवान शिव बरोबर जोडला गेला आहे. त्यामुळे मन शांत राहून आपल्या सौदऱ्यात भर पडते. मन एकाग्र होते. रक्त संचार चांगला होतो.
सिंदूर:
आपल्या डोक्यावरील बरोबर मध्य =भागी असणाऱ्या भांगामधे सिंदूर भरणे खूप महत्वाचे आहे. सिंदूर भरल्याने आपली बुद्धी नेहमी सतर्क व सक्रिय राहते. त्यामुळे टेंशन कमी होण्यास मदत होते. पण फक्त लग्न झालेल्या महिलाच भांगामध्ये सिंदूर भरू शकतात त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह वाढतो.
काचेच्या बांगड्या:
विवाहित महिलांनी काचेच्या बांगड्या घालणे खूप शुभ मानले जाते. काचेच्या बांगड्यांचा खन खन असा छान आवाज येतो. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी दूर होते.
मंगळसूत्र:
प्रतेक विवाहित महिलानी मंगळसूत्र घातले पाहिजे. आपले पूर्वज असे म्हणतात की गळ्यातील मंगळसूत्र बाहेर नदाखवता ते लपवून ठेवले पाहिजे कारणकी भारतीय महिला खूप कष्ट करतात व त्यांचे ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणे जुरूरीचे आहे. मंगळसूत्र लपवून ठेवल्याने ते शरीराला स्पर्श होते व त्याचा चांगला लाभ आपल्याला मिळतो.
जोडवी:
लग्न झालेल्या महिला पायात जोडवी घालतात हे आपण पाहिले असेलच. पायाच्या बोटांमद्धे जोडवी घातल्यामुळे त्याचे कनेक्शन एकदम गर्भधारणा व हृदय ह्याच्याशी असते. जोडवी घातल्यामुळे गर्भधारणा सहज होते. व तेच बरोबर मासिक पाळी सुद्धा नियमित राहते. चांदीची जोडवी घातल्यामुळे ते जमिनीला स्पर्श होऊन जमिनीतील चांगली ऊर्जा ग्रहण केली जाऊन पूर्ण शरीराला पोचली जाते.
नाकातील चमकी:
नाक टोचून त्यामध्ये चमकी किंवा लोंग घातल्यामुळे श्वासा संबंधित रोगांपासून बचाव होतो.
पैंजण:
चांदीचे पैंजण घातल्यामुळे शरीरीक दुखणे कमी होते. चांदीचे पैंजण नेहमी पायाला घासले जातात त्यामुळे स्त्रियांच्या हाडांचे रोग बरे होतात. त्यामुळे पायाची हाडे मजबूत होतात. आणि शरीराची ठेवण नियंत्रणात राहते.
कानातील डूल म्हणजेच इयररिंग:
कानात इयररिंग घातल्यामुळे मासिकपाळी नियमित राहण्यास मदत होते. तसेच शरीराला ऊर्जा मिळते. म्हणूनच कानात सोन्याचे किंवा चांदीचे इयररिंग घालण्यास सांगतात.