Ashad Deep Amavasya 2021 Importance, Puja Vidhi In Marathi

Ashad Amavasya 2021
Ashad Deep Amavasya 2021

आषाढ दीप अमावस्या 2021 महत्व माहिती पूजाविधी 

आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या होय. आषाढ अमावस्यालाच दीप अमावस्या सुद्धा म्हणतात. आषाढ अमावस्या झालीकी पुढचा दिवश म्हणजे श्रवाण महिन्याची सुरवात होते. आषाढ अमावस्याच्या दिवशी घरातील सर्व दिवे छान घासून पुसून स्वच्छ करून त्याची यथासांग पूजा करतात.

The Marathi Ashad Deep Amavasya 2021 Importance, Puja Vidhi can of be seen on our YouTube Channel of Ashad Amavasya 2021

आपल्या संस्कृतीत दिव्याला खूप महत्व आहे. आपल्या घरातील इडापिडा टळावी व त्याच बरोबर अज्ञान, रोगराई दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरावा त्यासाठी ह्या दिवशी दिव्यांची पूजा करायची फार पूर्वी पासून प्रथा आहे.

आषाढ अमावस्या वेळ:
7 ऑगस्ट 2021 शनिवार रात्री 7 वाजून 11 मिनिट ते
8 ऑगस्ट 2021 रविवार संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिट

Ashad Amavasya 2021
Ashad Deep Amavasya 2021

आषाढ दीप अमावस्या ह्या दिवशी काय करावे:
ह्या दिवशी भगवान शिव, पार्वती, गणेश व कार्तिक स्वामींची पूजा करतात. व काही जन ह्यादिवशी व्रत सुद्धा करतात. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
ह्या दिवशी महिला तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालतात.
ह्या दिवशी पुरणाचा नेवेद्य बनवून पितरांना दाखवतात.
ह्या दिवशी पितरांना तर्पण देवून पुरणाचा नेवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात व त्यांना मुक्ती मिळून आपल्याला आशीर्वाद देतात.
तसेच ह्या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू, किंवा तुळशीची झाड लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे ग्रहदोष दूर होतो.
ह्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याचे महत्व आहे. त्याच बरोबर माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घालायची पद्धत आहे.

दीप अमावस्या पूजा विधी:
ह्या दिवशी आपल्या घरात असणारे दिवे, समया, लामण दिवे सर्व घासून पुसून स्वच्छ करतात.
मग एका पाटावर लाल रंगाचे कापड घालून पाटा भोवती छान रंगीत रांगोळी काढावी.
पाटावर दिवे मांडून त्याच्या भोवती फुले ठेवून सजावट करावी.
मग सर्व दिव्यामद्धे कापसाची डबल वात घालून तेल घालावे व दिवे प्रज्वलित करावे.
जर आपल्याला शक्य असेल तर ओल्या मातीचे दिवे सुद्धा बनवून पूजेत ठेवावे.
काहीजणांकडे कणकेचे गोड दिवे बनवून लावण्याची सुद्धा प्रथा आहे.
दिव्याना हळद-कुंकू व अक्षता वाहून त्याची मनोभावे पूजा करावी.
मग नेवेद्य दाखवावा त्यामध्ये गोड दिवे ठेवावे.

निरांजन आरती करावी मग कहाणी आईकावी.
संध्याकाळी दिवे लावल्यावर शुभंकरोती म्हणावी व घरातील लहान मुलांना ओवाळावे. घरातील लहान मुले हे वंशाचे दिवे मानले जातात म्हणून त्यांचे औक्षण करावे.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.