गरमीमद्धे सुद्धा स्वीट कॉर्न मक्याचे कणीस सेवनाचे आरोग्यदाई फायदे
स्वीटकॉर्न आपण बऱ्याच पदार्थामध्ये वापरू शकतो. स्वीट कॉर्नचे आपण सूप, स्नॅक्स, टॉपिंग व त्याचे पीठ बनवण्यासाठी सुद्धा करू शकतो. त्याच्यामध्ये बरेच पोषक तत्व आहेत ते आपले आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
The Marathi Health Benefits of Sweet Corn can of be seen on our YouTube Channel of Health Benefits of Sweet Corn
स्वीट कॉर्न हे सर्वाना आवडते. कारणकी ते स्वादिष्ट लागते व ते आरोग्याच्या दृष्टीने हितावह सुद्धा आहे. गरमीच्या दिवसांत सुद्धा आपण त्याचे सेवन करू शकतो. स्वीटकॉर्न मध्ये पोषक तत्व आहेत. त्याच्या मध्ये मिनरल, एंटीऑक्सीडेंट व विटामिन ए, बी, ई सारखे पोषक तत्व आहेत. तसेच आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यास मदत होते.
स्वीट कॉर्न सेवनाचे फायदे:
पचन तंत्र – स्वीट कॉर्न मध्ये फायबर आहे ते पचन क्रिया चांगली ठेवण्यास मदत करते. त्याच्या मुळे गॅस, एसिडिटी व बुद्धकोष्टताच्या समस्या दूर करते व पचन शक्ति नीट ठेवते.
डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेमंद: स्वीट कॉर्नमध्ये एंटीऑक्सीडेंट व विटामिन आहेत जे डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवते. त्याच्या मुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते.
कोलेस्ट्रॉसाठी – स्वीट कॉर्न मध्ये फाइबर जास्त प्रमाणात आहे. ते शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते व त्याच बरोबर त्यामध्ये विटामिन्स आहेत ते आपल्या शरीराला फायदेशीर आहेत. त्याच बरोबर डायबिटीज च्या समस्या दूर करण्यास मदत करते.
कैंसर पासून बचाव – स्वीट कॉर्न मध्ये फेनोलिक फ्लेवोनोइड एंटीऑक्सीडेंट आहे. हा कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी चांगला सोर्स आहे.
ब्लड शुगर कंट्रोल – स्वीट कॉर्न मध्ये स्टार्च व फाइबर आहे. ते ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये ठेवते. ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आपण स्वीट कॉर्नचा समावेश आपल्या जेवणात करू शकता.
त्वचा साठी – स्वीट कॉर्न मध्ये बेटा केरोटीन जास्त प्रमाणात आहे. ते विटामिन ए मध्ये बदलून आपली स्किन व डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवते. त्यामुळे इम्यूनिटी सिस्टम मजबूत होते. त्यामध्ये एंटीऑक्सिडेंट पण जास्त प्रमाणात आहे. जे शरीराला बऱ्याच रोगांपासून दूर ठेवते.
एजिंग साठी – स्वीट कॉर्न मध्ये एंटीऑक्सिडेंट आहे त्यामुळे आपल्या त्वचे वरील सुरकुत्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
एनीमिया दूर करण्यासाठी – स्वीट कॉर्न मध्ये फोलिक एसिड व विटामिन बी 12 भरपूर प्रमाणात आहे. ते शरीरातील लाल रक्त पेशी बनवण्यास मदत करते. त्यामध्ये आयर्न आहे जे शरीरातील रक्त कमी असेल तर वाढवण्यास मदत करते.
कार्बोहाइड्रेट व कैलोरी – स्वीट कॉर्न मध्ये कार्बोहाइड्रेट व कैलोरी अधिक प्रमाणात आहे. ते आपल्याला एनर्जेटिक ठेवते. ते पाचन तंत्रला स्वस्थ ठवते त्यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते.
प्रोटीन व फॅट – स्वीट कॉर्नमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहेत. प्रोटीन सेल्सना रिपेर करण्याच्या बरोबर मसल्स बनून रोगप्रतिकार शक्ति वाढते.
डाइटरी फायबर– ह्यामध्ये डाइटरी फायबर हे भरपूर आहे तसेच ते कार्बोहायडरेट पचवण्यास मदत करते व त्याच बरोबर ब्लड शुगर लेवल बरोबर ठेवते. बुद्धकोष्ट च्या बरोबर कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका कमी करते. जर आपल्याला शरीराचे वजन कमी करायचे आहे तर स्वीट कॉर्न खाणे फायदेशीर आहे.
पोटेशीयम मिनरल – पोटेशीयम एक इलेट्रोलाइट मिनरल आहे. आपल्या हार्ट फंकशनसाठी उपयोगी आहे. त्याच्या सेवनाने हाडे सुद्धा मजबूत राहतात.