तळलेल्या तेलाचा पुनर्वापर ठरू शकतो घातक किंवा आरोग्यासाठी नुकसान दायक
तळलेले तेल परत परत वापरणे ठरू शकते आपल्या आरोग्यासाठी घातक
आपण रोजच्या स्वयंपाकात तळलेला पदार्थ बनवतो. किंवा दिवाळीच्या वेळेस किंवा इतर सणवारच्या दिवशी सुद्धा तळलेले पदार्थ बनवतो. मग राहिलेले तेल आपल्याला टाकून द्यायला जीव होत नाही. आपण विचार करतो की तेल किती महाग आहे व एव्हड तेल कसे टाकून द्यायचे. मग आपण ते परत परत वापरतो पण मेडिकल सायन्स प्रणामे ते परत परत वापरणे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे.
The Marathi Reheating Cooking Oil Dangerous for Our Health can of be seen on our YouTube Channel of Reheating Cooking Oil Dangerous for Our Health
अश्या तेलाला आपण परत परत वापतो की त्याचा रंग बदले पर्यन्त. खर म्हणजे एकदा तेल वापरले की ते दुसऱ्या वेळी वापरण्याच्या योग्य नसते. ते टाकूनच द्यावे किंवा पदार्थ तळताना तेल अगदी मापातच घ्यावे. खरम्हणजे पूर्वीच्या काळी घाण्याचे तेल वापरले जायचे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. आता रिफाईड तेलाचा वापर जास्त प्रमाणात होतो त्यामुळे आरोग्याच्या समस्या सुद्धा बऱ्याच वाढल्या आहेत.
आता आपण पाहूया अश्या प्रकारचे तेल वापरण्याने नुकसान काय होते.
कॅन्सरचा खतरा:
आपण एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरले तर त्यामुळे आपल्या शरीरात कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होतो. हे खरे आहे आपण वाचले सुद्धा असेल की एकदा आपण पुरी, भजी, वडे किंवा काही तळले तर त्यातच परत कोणतासुद्धा पदार्थ तळू नये.
दुसऱ्यांदा तेल गरम करण्याचे नुकसान
आपण तेल गरम करतो तेव्हा आपण जितक्या वेळेला तेल गरम करतो तेव्हा त्यामध्ये कॅन्सरचे जंतु सुक्ष्म प्रमाणात निर्माण होतात मग आपण पुन्हा पुन्हा सेम तेल गरम केले तर त्यामध्ये अजून जंतु निर्माण होउ शकतात.
तेलाचा सुगंध नष्ट होतो
आपण जेव्हा पहिल्यांदा तेल गरम करतो तेव्हा आपल्याला तेलाचा सुगंध येतो पण आपण परत तेल गरम केले तर त्याचा सुगंध जातो. कारण की त्या तेलामध्ये एंटी-ऑक्सीडेंट्स येतात जे कॅन्सरच्या किटानुना जन्म देतात. मग आपण सेम तेल गरम करून वापरले तर टे किटाणू चिटकून आपल्या शरीरात जातात.
हृदयाचे आजार:
असे परत परत तळलेले तेल वापरले तर कॅन्सरच नाहीतर आपले रक्तातील कॉलेस्ट्रोल सुद्धा वाढते त्यामुळे हृदय संबंधित रोग होण्यास मदत होते. त्याच बरोबर अल्जाइमर, एसिडिटी, पार्किसंस ह्या सारखे सुद्धा रोग होउ शकतात. आपण विचार करा की एक छोटीशी गोष्ट आपले जीवन किती धोकादायक बनवू शकते.
आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या असतील पण काहीजण आर्थिक परिस्थितीने मजबूर असतील व ते हे तळलेले तेल टाकून देवू शकत नसतील तर त्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.
तळण्यासाठी ऑलिव ऑयल चा उपयोग डीप फ्राइ करण्यासाठी करू नये. आपण जे कोणते तेल वापरत असाल व पुढच्या वेळेला तेच तेल गरम करताना त्याचा रंग अधिक गडद झाला असेलतर असे तेल वापरू नका. किंवा ते घट्टसर झाले तरी वापरू नका. किंवा काही वेळेस आपण कोणता पदार्थ म्हणजे हलके काही तळतो तेव्हा ते तेल वापरू शकतो. तसेच काही तेलामध्ये स्मोकिंग पॉइंट जास्त असतो किंवा काही तेलामध्ये कमी असतो त्यावर ते अवलंबून असते.
आपण किती वेळा गरम केलेले तेल परत वापरू शकता
आपण घरात जे तेल वापरतो त्या तेलामध्ये पुरी किंवा भाज्या वापरुन पकोडे तळतो तेव्हा बेसन, तांदळाचे पीठ, आटा वापरतो तेव्हा तळल्या नंतर खाली कढईमध्ये मिश्रणाचा स्तर जास्त प्रमाणात आला असेलतर ते तेल आपण 2-3 वेळा वापरू शकतो. मग फेकून देऊ शकता.
जर आपण माँस-मछी तळले असेल तर ते तेल एकदाच वापरा मग फेकून द्या. म्हणजेच तळून झालेकी फेकून द्या. म्हणूनच तेलाचा वापर करताना योग्य प्रमाणात करा म्हणजे तेलाचे सुद्धा नुकसान होणार नाही.