टेस्टी चमचमीत झणझणीत नागपुरी तर्री पोहे नाश्त्यासाठी रेसीपी
कांदा पोहे हे महाराष्ट्रमधील लोकप्रिय पारंपारिक डिश आहे. एक गंमत आहे. पूर्वीच्या काळी लग्न कर्तव्य असणाऱ्या मुलीच्या घरी मुलाकडचे बघण्याच्या प्रोग्रामसाठी जायचे तेव्हा मुलीकडचे कांदा पोहे अगदी आवर्जून बनवायचे. मग मुलीला चिडवायचे काय आज कांदा पोहे प्रोग्राम आहे का? असो.
The Perfect Nagpur Style Tarri Poha For Breakfast can of be seen on our YouTube Channel of Tarri Poha
कांदा पोहे हे महाराष्ट्र बरोबरच इतेर प्रांतात सुद्धा लोकप्रिय झाले आहेत. फक्त प्रतेक प्रांताची पोहे बनवण्याची पद्धत निराळी आहे. पोहे हे टेस्टी लागतात. आपण सकाळी किंवा दुपारी सुद्धा चहाच्या वेळी बनवू शकतो.
आपण ह्यापूर्वी इंदोर ह्या प्रांतात स्टीम पोहे कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण नागपूर ह्या भागात चमचमीत झणझणीत तर्री पोहे बनवतात. तर्री पोहे आपण अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवू शकतो ते पाहू या. तर्री पोहे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत.
तर्री पोहे बनवण्यासाठी वेळ: 20-25 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
तर्री बनवण्यासाठी: साहीत्य:
1/2 कप हरबरे (7-8 तास भिजवून)
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1 छोटा कांदा (बारीक चिरून)
1 टी स्पून आल-लसूण (कुटून)
1 छोटा टोमॅटो (बारीक चिरून)
1/4 टी स्पून हळद
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1/4 टी स्पून गोडा मसाला
1/2 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
कोथिंबीर
पोहे साहीत्य:
2 कप पोहे
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1 टे स्पून शेंगदाणे किंवा मटार
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
7-8 कडीपत्ता पाने
1/2 टी स्पून हळद
मीठ चवीने
1 टे स्पून लिंबुरस
1 टी स्पून साखर
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
सजावटीसाठी:
1 छोटा कांदा (चिरून)
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
1 छोटा टोमॅटो (चिरून)
शेव व फरसाण
कृती: तर्री बनवण्यासाठी: प्रथम हरभरे 7-8 तास पाण्यात भिजत ठेवा.
आल-लसूण कुटून घ्या. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या. कोथिंबीर चिरून घ्या. मग कुकरमद्धे ठेवून 4-5 शिट्या काढून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून चिरलेला कांदा घालून थोडा परतून घेऊन त्यामध्ये आल-लसूण घालून थोडे परतून त्यामध्ये टोमॅटो घालून परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, गोडा मसाला, धने-जिरे पावडर घालून शिजवलेले हरभरे घालून 1 कप पाणी घालून चवीने मीठ घालून मिक्स करा. मग 5-6 मिनिट मंद विस्तवावर उकळी येवू द्या. मग कोथिंबीर घालून मिक्स करून पॅन झाकून बाजूला ठेवा.
पोहे बनवण्यासाठी: कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची चिरून घ्या. प्रथम पोहे चाळून चाळणीमद्धे घेऊन धुवून मग चाळणीवर निथळत ठेवा.
पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, हिरवे मटार घालून मग चिरलेला कांदा घालून छान गुलाबी रंगावर प घ्या. चाळणीवरच्या पोह्याला मीठ, लिंबू व साखर लावून हलवून मग परतलेल्या कांद्यात घालून चांगले ढवळून घ्या. कोथिंबीर घालून मिक्स करून पॅनवर झाकण ठेवून मंद विस्तवावर एक वाफ येवू द्या.
एका बाउलमध्ये थोडे पोहे घालून त्यावर 1-2 डाव तर्री घालून वरतून चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण व शेव घालून सर्व्ह करा.