एक्स्पर्ट टिप्स पितरांसाठी तर्पण (पितृ पक्ष ) देण्याचे महत्व, विधी, शुभ मुहूर्त
घरच्या घरी पितरां ना तर्पण देण्याची विधी त्याच बरोबर काही महत्वाच्या टिप्स
20 सप्टेंबर 2021 सोमवार पासून पितृ पक्ष सुरू झाला आहे. हिंदू धर्ममध्ये पितृ पक्षचे फार महत्व आहे. ह्या 15 दिवसांत आपल्या सर्व पितरांची पूजा करतात. त्यांना तर्पण देऊन त्यांचा आत्मा तृप्त करतात. पण आपल्याला माहीत आहे का की तर्पण देण्याचे काय महत्व आहे?
The Pitru Paksha 2021 Importance, Vidhi And Shubh Muhurt can of be seen on our YouTube Channel of Pitru Paksha 2021
तहानलेल्या व्यक्तिला पाणी दिल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. तेव्हा ती व्यति मनापासून आशीर्वाद देते. तसेच जर आपण आपल्या पितरांना तर्पण दिले तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते व त्यांचे आशीर्वाद मिळतात.
तर्पण कसे द्यायचे त्याची विधी:
तर्पण द्यायची विधी खूप सोपी आहे. फक्त पाणी, तीळ व फूल ह्याचा वापर करून तर्पण द्यायचे आहे. त्याची विधी अशी आहे.
तर्पण देण्यासाठी एक तांब्याचा लोटा घ्या किंवा स्टीलचा लोटा घेतला तरी चालेल पण प्लॅस्टिकचा लोटा घेऊ नये कारण की पूजा अर्चा करताना प्लॅस्टिक वस्तु वापरू नये.
एका लोटयामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे. त्यामध्ये काळे तीळ व गुलाबाच्या पाकळ्या घालाव्या. तीळ हे हिंदू धर्मामध्ये खूप शुद्ध व पवित्र मानले जातात.
तर्पण देताना नेहमी आपले तोंड दक्षिण दिशेला पाहिजे, त्याच बरोबर आपल्या पूर्वजांना आपल्या बरोबर असायला सांगावे म्हणजे तसे आमंत्रण द्यावे. त्यांना आमंत्रण देताना ‘ॐ आगच्छन्तु में पितर एवं ग्रहन्तु जलान्जलिम’ हा मंत्र जाप करा. ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की पाणी ग्रहण करा व आम्हाला भेटायला या.
वडिलांना किंवा आजोबांना तीनवेळा जल अर्पण करा. व आईचे स्थान हे सर्वोच्च आहे म्हणून दक्षिण दिशेला 14 वेळा जल अर्पण करा.
जलांजलि देण्याचा मुहूर्त:
हिंदू धर्ममध्ये प्रतेक काम करण्याचा एक निश्चित वेळ म्हणजेच शुभ मुहूर्त असतो. देवांना जल अर्पण करण्याचा शास्त्रामध्ये ब्रह्म मुहूर्त चा सल्ला दिला जातो. तसेच संध्याकाळच्या वेळी तंत्रविद्या व वेगळ्या प्रकारच्या शक्तिना शांत करण्यासाठी तर्पण दिले जाते. पूर्वजांना अभिजीत मुहूर्तवर जलांजलि देतात.
पूर्वजांना का तर्पण देतात:
देवशयनी एकादशीला सर्व देव झोपलेले असतात मग 4 महिन्या नंतर देवोत्थानी एकादशी ला सर्व देवांना उठवतात. पण ही पद्धत गणेश चतुर्थी पासून सुरू होते. श्री गणेश हयाना सर्व देवांमद्धे सर्व प्रथम पूजले जाते. म्हणून गणेश चतुर्थी आलीकी गणेश जीना 11 दिवस पूजले जाते. मग त्या नंतर पूर्वजांना पूजले जाते. म्हणूनच पितृ पंढरवडा की 15 दिवस पितरांना पूजले जाते. ह्या मध्ये ब्राह्मनाला भोजन व तर्पण दिले जाते. पूर्वजां नंतर आईला सर्वात जास्त स्थान दिले जाते. म्हणूनच मग नवरात्रीमध्ये नव दुर्गाची पूजा केली जाते. मग त्यानंतर हळू हळू सर्व देव जागे व्हायला लागतात. गणपती उत्सव झालाकी सर्व देवांच्या अगोदर पूर्वजांना महत्व दिले जाते.