क्रीमी टेस्टी कस्टर्ड वनीला केक रेसिपी
केक हा सर्वाना आवडतो घरात कोणाचा बर्थडे असो किंवा पाहुणे आलेतर आपण डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो किंवा घरी पार्टी असेलतर अश्या प्रकारचा केक बनवा सगळे अगदी आवडीने खातील केक लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. आपण ह्या अगोदर बरेच वेगवेगळ्या प्रकारचे केक पाहिले.
आज आपण एक नवीन प्रकारचा केक बघणार आहोत. आपण ह्या अगोदर कस्टर्ड केक कसा बनवायचा ते पहिले हा सुद्धा कस्टर्ड केक आहे पण ह्याची पद्धत व टेस्ट खूप निराळी आहे. अश्या प्रकारच्या केकला वरतून आईसिंग करायची गरज नाही ते कसे ते येथे पहा.
The Creamy Tasty Custard Vanila Cake For Kids can of be seen on our YouTube Channel of Zatpat Easy Custard Vanila Cake For Kids
क्रीमी टेस्टी कस्टर्ड वनीला केक बनवताना आपण ओव्हन किंवा कुकरमद्धे किंवा भांड्यात सुद्धा बनवू शकतो. क्रीमी टेस्टी कस्टर्ड वनीला केक बनवायला अगदी सोपा आहे व मस्त थंडगार लागतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
बेकिंग वेळ: 35 मिनिट
वाढणी: 6-8 जणसाठी
साहीत्य:
1 कप मैदा
1 टी स्पून बेकिंग पावडर
2 अंडी
½ कप साखर
½ कप तेल
1 टी स्पून वनीला एसेन्स
¼ कप दूध (किंवा अजून लागले तर थोडेसे)
कस्टर्ड करिता:
½ लिटर दूध
3 टे स्पून कस्टर्ड पावडर
2-3 थेंब वनीला एसेन्स
बदाम व चेरी सजावटी करिता
कृती:
प्रथम मैदा व बेकिंग पावडर चाळून बाजूला ठेवा. बेकिंग ट्रेला तेल लावून बाजूला ठेवा. बदाम कापून घ्या. मायक्रोवेव्ह प्रीहिट करून करायला ठेवा. किंवा जर कुकरमद्धे केक बनवायचा असेल तर कुकर 5-7 मिनिट गरम करून त्यामध्ये एक स्टँड ठेवा. कुकरच्या झाकणाची शिटी व रिंग काढून ठेवा.
एका बाउल मध्ये अंडी फोडून एग बिटरनी चांगली फेटून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून सारख विरघळे पर्यन्त फेटून घ्या. मग त्यामध्ये तेल व वनीला एसेन्स घालून चांगले मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये मैदा घालून हळुवार पणे मिक्स करून घ्या. लागेल तसे हळू हळू दूध घालून मिक्स करा. आता आपले केकचे मिश्रण तयार झाले. आता तेल लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण काढून घ्या.
मायक्रोवेव्ह 180 ड्रगरीवर प्रीहिट करून घेतल्यावर त्यामध्ये ट्रे ठेवून 35 मिनिट बेक करून घ्या. किंवा कुकरमद्धे भांडे ठेवून 35 मिनिट केक बेक करून घ्या. मग ओव्हन बंद करून केक ओव्हनमध्ये 15 मिनिट तसाच ठेवा. दार उघडू नका. 15 मिनिट झाल्यावर केक बाहेर काढून थंड करायला ठेवा. केक थंड झाल्यावर त्याचा कडा सुरीने सैल करा.
एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करून त्यामध्ये साखर घालून साखर विरघळे पर्यन्त आटवून घ्या. एका बाउलमध्ये कस्टर्ड पावडर व थोडे दूध मिक्स करून गरम दुधात मिक्स करून घ्या. मग 2-3 मिनिट गरम करून थोडेसे घट्ट झालेकी विस्तव बंद करा.
केक थंड झाल्यावर गरम गरम कस्टर्ड केकवर एक सारखे ओतून घ्या. वरतून बदाम व चेरीने सजवून फ्रीजमध्ये 3-4 तास थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर सर्व्ह करा.
Khup chan recipe