गुडघे दुखीने त्रस्त आहात सोपे घरगुती उपाय करून पहा
आजकाल आपली जीवनशैली बदलत चालली आहे. त्यामुळे सांधे दुखी किंवा गुडघे दुखीच्या समस्या खूप वाढत चालल्या आहेत. त्याला कारण म्हणजे सांधेदुखी होय.
गुडघे दुखीहे शरीरात वात असण्याने सुद्धा होतो. त्याचे काही संकेत सुद्धा आहेत.
सांधेदुखी, गाऊट, रूमेटाइड अर्थराइटिस, ऑस्टियोमायइलिटिस, टेन्डीनिस, सांधे आखडणे, किंवा गुडघ्याची झीज, किंवा मोच येणे किंवा जखम होणे इ.
The Home Remedies To Get Rid For Knee Pain can of be seen on our YouTube Channel Home Remedies To Get Rid For Knee Pain
गुडघे दुखीची लक्षण:
चालताना, उभे राहताना किंवा हलतांना किंवा आराम करताना दुखू लागतात. गुडघ्याला सूज येणे, चालताना गुडघे लॉक होणे, सांधे कडक होणे, मुरगळणे, शरीर आखडणे, गुडघे किंवा सांधे दुखी, सकाळी उठल्यावर गुडघे दुखणे, मांडी घातल्यावर गडघे दुखणे, भारतीय कमोडवर बसताना त्रास होणे,
गुडघे दुखी पासून वाचण्यासाठी काही सटीक उपाय:
रात्रीच्या वेळी हलका आहार घ्या.
रात्रीच्या जेवणात चणे, भेंडी, अरबी, बटाटे, काकडी, मुळा, दही राजमा इ चे सेवन करू नये.
दही, भात, ड्रायफ्रूट, डाळ व पालक जास्त प्रमाणात सेवन करू नका कारण ह्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आहे.
रात्री झोपताना दूध किंवा डाळीचे सेवन करणे हानिकारक आहे. त्यामुळे शरीरात जास्तीचे युरीक अॅसिड जमा होते सालाची डाळीचा वापर करू नये. दुधाचे सेवन दिवसा करावे.
जर मांसाहारी असला तर त्याचे प्रमाण कमी करावे. त्याने सुद्धा युरीक अॅसिड वाढते.
बेकरी प्रॉडक्ट मध्ये पेस्ट्री, केक, पॅन केक,बिस्किट कमी प्रमाणात सेवन करावे. त्यानेसुद्धा युरीक अॅसिड वाढते.
पाणी सुद्धा जरूर तेव्हडे सेवन करावे. जेवण करताना पाणी पिऊ नका. जेवण झाल्यावर अर्धा तास झाल्यावर पाणी सेवन करा.
युरीक अॅसिडच्या परेशानी पासून वाचण्यासाठी सोया मिल्क, जंक फूड, चटपटे, पदार्थ, थंड पेय, तळलेले पदार्थ जास्त खावू नये.
अति गोड पदार्थ म्हणजेच चॉकलेट, केक, सॉफ्ट ड्रिंक व मैदा ह्या मुळे शरीरातील युरीक अॅसिड वाढते.
धूम्रपान केल्याने शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो. त्यामुळे मुबलक ऑक्सिजन मिळत नाही. त्याच बरोबर निकोटीन मुळे शरीराला रक्त पुरवठा नीट होत नाही. त्यामुळे पाठीचे दुखणे होते व हृदयाचे रोग होतात. जर तुम्हाला पाठीचे दुखणे होत असेल तर ह्या सवाई सोडा.
गुडघे दुखी होउ नये म्हणून नेहमी चालण्याचा व्यायाम करा. नेहमी हालचाल केली तर दुखणे होणार नाही.
शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा. शरीराचे जास्तीचे वजन आपल्या पायावर व कमरेवर भार येऊन दुखू शकतात. त्यामुळे शरीराचे कार्टिलेज तुटण्याचा संभव असतो. म्हणून आपले वजन नेहमी नियंत्रणात ठेवा.
आपण नियमित व्यायाम करत असताल तर जास्त स्ट्रेचिंग करू नका. मधून मधून वार्मअप सुद्धा करायला पाहिजे.
दुधाचे सेवन केल्याने दुधामद्धे कैल्शियम व विटामिन-डी भरपूर प्रमाणात आहे. ते आपले सांधे मजबूत बनवते. म्हणून रोज नियमित दूध सेवन करा. त्यामुळे हाडे सुद्धा मजबूत होतील. जर आपल्याला दूध आवडत नाहीतर दुधापासून बनवलेले पदार्थ सेवन करा.
गुडघे दुखीपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय: Home Remedies for Knee Pain
जर गुडघे दुखी होत असलेतर लगेच औषध घेवू नका. त्यासाठी प्रथम घरगुती उपाय करून पहा. जर घरगुती उपाय केल्यावर सुद्धा आराम मिळत नसेलतर औषध उपचार सुरू करा.
हळद व चुना:
गुडघेदुखी पासून आराम मिळण्यासाठी हळद व चुना मिक्स करून त्याचा लेप लावावा. हळद व चुना त्यामध्ये मोहरीचे तेल मिक्स मिक्स करून गरम करावे मग तो लेप गुडघ्यावर लावावा. त्यामुळे बराच आराम मिळेल.
दूध व हळद फायदेशीर:
एक ग्लास दुधामद्धे एक चमचा हळद पावडर घालून गरम करून सेवन करावे. त्यामुळे सांधेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
प्राकृतिक उपचार गुडघे दुखीवर फायदेमंद:
रोज सकाळी थोडावेळ उन्हात बसल्याने सूर्य किरणांमधून विटामीन D मिळते ते आपल्या हाडांसाठी फायदेमंद आहे.
आले:
रोज आले सेवन करा त्यामुळे सांस संबंधित तक्रार, गुडघे दुखी, सूज येणे कमी होईल.
एलोवेरा:
एलोवेराचा गर व हळद मिक्स करून थोडा गरम करून त्याचा लेप गुडघ्यावर लावावा त्याने आराम मिळतो.
गुडघे दुखीवर आराम देते मोहरीचे तेल: मोहरीचे तेल दुखऱ्या भागावर चोळावे त्यामुळे दुखणे कमी होईल.
लवंग:
लवंग हे दाताच्या दुखण्यावर जसे लाभदायक आहे तसेच गुडघे दुखी किंवा सूज ह्यावर लवंग लाभदायक आहे. लवंगची पावडर करून त्यामध्ये लवंगचे तेल घालून मिक्स करून दुखऱ्या भागावर लावावे किंवा कापसाचा बोळा लावावा.
अश्वगन्धा किंवा सुंठ पाउडर:
40 ग्राम अश्वगन्धा पाउडर व 20 ग्राम सुंठ पावडर व 40 ग्राम गुळाची पावडर मिक्स करून 3-3 ग्राम मिश्रण रोज गरम दुधामद्धे घालून घेतल्यास चांगला आराम मिळतो.
मेथी दाणे:
रोज सकाळ संध्याकाळी एक-एक चमचा गरम पाण्या सोबत घेतल्याने गुडगे दुखी कमी होते.
मसाज किंवा शेकून काढा:
मसाज किंवा शेकून काढल्याने बराच फायदा होतो. त्याच बरोबर 250 ग्राम मोहरीचे तेल गरम करायला ठेवा त्यामध्ये 8-10 लसूण पाकळ्या, एक-एक चमचा ओवा, मेथी दाणे, सुंठ पावडर, घालून शिजवून घ्या. थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून ठेवा. व त्याने सकाळ संध्याकाळ मालीश करा.
एक्सरसाइज फायदेमंद:
खूपच त्रास होत असेल तर ऑर्थोपीडिक डॉक्टर चा सल्ला घेऊन औषध उपचारा बरोबर एक्सरसाइज करा. किंवा फिजियोथेरेपिस्टचा सल्ला घ्या.