दसरा (विजया दशमी) 2021 पूजाविधी मुहूर्त झेंडूच्या फुलाचे महत्व
दसरा 15 ऑक्टोबर 2021 शुक्रवार ह्यादिवशी आहे. हिंदू धर्मामध्ये दसरा ह्या सणाला खूप महत्व आहे. साडेतीन मुहूर्त पैकी दसरा हा एक शुभ मुहूर्त आहे. दसरा हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. ह्या दिवशी कोणतेपण चांगले काम करण्यासाठी मुहूर्त काढायची गरज नाही. विजयाची प्रेरणा देणारा हा सण आहे.
The Dussehra (Vijayadashami 2021) can of be seen on our YouTube Channel Dussehra (Vijayadashami 2021) Puja Vidhi Zendu Fulache Mahatva
शारदीय नवरात्री 7 ऑक्टोबर 2021 ह्या दिवशी आरंभ झाली आहे व 14 ऑक्टोबर 2021 गुरुवार ह्या दिवशी समाप्त होणार आहे. मग दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर 2021 शुक्रवार ह्या दिवशी दसरा आहे. म्हणजेच विजया दशमी आहे. ह्या सणाला सर्व वाईट गोष्टीचा अंत होऊन चांगल्या गोष्टीची सुरवात करावी. ह्या दिवशी रावणाचे दहन करून शस्त्र पूजा करण्याला खूप महत्व आहे. तसेच ह्यादिवशी शाळा कॉलेज मध्ये जाणारी मुले आपल्या पाठ्या पुस्तकांची पूजा करतात म्हणजेच सरस्वती माताची पूजा करतात. त्याच बरोबर आपल्या घरातील वाहनांची पूजा करतात.
दसरा शुभ मुहूर्त:
विजय मुहूर्त 15 ऑक्टोबर 2021 शुक्रवार दुपारी 1 वाजून 38 मिनिट ते 2 वाजून 24 मिनिट
आश्विन महिना शुक्ल पक्ष दशमी तिथी आरंभ 14 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिट ते 15 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजून 2 मिनिट
दसरा ह्या सणाचे महत्व:
दसरा ह्या दिवशी श्री राम यांनी रावण चा वध केला होता व माता सीता ह्यांना रावणाच्या कैदेतून मुक्त केले होते. हा पर्व म्हणजे बुराई वर अच्छाई चा विजय ह्याचे प्रतीक आहे. तसेच ह्या दिवशी माता दुर्गानी महिषासुर चा वध केला होता.
दसरा हा दिवशी सकाळी लवकर उठून आपले घर स्वच्छ करून घरासमोर सडा रांगोळी काढावी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. देवाची विधी पूर्वक पूजा अर्चा करून शास्त्राची व आपल्या वाहनाची पूजा करावी हळद कुकु व झेंडूच्या फुलांचा हार लावावा. गोडाचा नेवेद्य दाखवावा. घरात गंगाजल शिंपडावे. आपट्याची पाने अर्पण करावी.
झेंडूच्या फुलाचे महत्व:
दसऱ्याच्या अगोदर झेंडूच्या फुलांची बाग बहरलेली दिसते. बाजारात सर्वत्र झेंडूची फुले दिसतात कारणकी ह्या दिवशी झेंडूच्या फुलांचे खूप महत्व आहे. तसेच ह्या दिवशी झेंडूच्या फुलांनी का सजवले जाते. ह्या सीझनमद्धे झेंडूची फुले सहज उपलब्ध होतात व त्याचे धार्मिक महत्व सुद्धा आहे.
1. झेंडूच्या फुलाचा रंग केशरी आहे. केशरी रंग विजय, हर्ष व उल्हास चे प्रतीक असून प्रतिनिधित्व करतो. झेंडूच्या फुलाचे बाकीच्या फुला पेक्षा अधिक महत्व आहे. गुलाब किंवा चमेली सारखी पण सुगंधित फूल आहेत पण झेंडूच्या फुलाचे महत्व अधिक आहे. झेंडूच्या फुलाचा रंग शुभ मानला जातो. त्याचा रंग पहिला की मन प्रफुल्लित होते. केशरी किंवा पिवळा किंवा लाल मिश्रित पिवळा रंग सर्वश्रेष्ठ मानला जातो. तसेच हा रंग स्नेह, सम्मान व प्रसन्नता दर्शवतो.
2. झेंडूच्या फुलाचे धार्मिक महत्व आहे. तसेच विजय पर्व व पूजेमद्धे ह्याचे महत्व आहे. झेंडूच्या फुलाला सूर्य देवचे प्रतीक मानतात. प्राचीन ग्रंथामध्ये हे फूल सुंदरता व सकारात्मक ऊर्जाचे प्रतीक मानतात. हे फूल शब्दाविनाच प्रसन्नता जाहिर करते.
आपट्याच्या पानाचे महत्व:
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकाना दिली जातात. कारणकी आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष आहे. व तो महादोषांचे निवारण करतो. त्याच बरोबर इष्ट देवताचे दर्शन घडवतो. व शत्रूचा नाश करतो. आपट्याचा वृक्ष शत तारका नक्षत्र व कुंभ राशीचा आराध्य वृक्ष मानला जातो.