करवा चौथ 2021 कधी आहे? पाच वर्षा नंतर शुभयोग पूजाविधी,पूजा मुहूर्त
करवा चौथ 2021 कार्तिक मास कृष्ण पक्ष चतुर्थी 24 ऑक्टोबर 2021 रविवार ह्या दिवशी आहे. खर म्हणजे ह्या वर्षी पाच वर्षा नंतर करवा चौथचा शुभ योग येत आहे. ह्या वर्षी करवा चौथ रोहिणी नक्षत्रमध्ये पूजन होणार आहे. त्याच बरोबर रविवार आहे त्यामुळे महिलाना सूर्य देवाची पूजा करून आशीर्वाद मिळणार आहे.
The Karwa Chauth 2021 can of be seen on our YouTube Channel Karwa Chauth 2021 Puja Vidhi Puja Muhurat Vidhi
करवा चौथ ह्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयूषासाठी निर्जल व्रत करतात. रात्री चंद्र दर्शन झाल्यावर उपवास सोडतात. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थी ह्या तिथीला हे व्रत करतात.
करवा चौथ हे व्रत पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश ह्या भागात करतात. महिला आपल्या पतीला दीर्घायुष मिळण्यासाठी करतात तसेच अविवाहित महिला चांगला पती मिळवा म्हणून करतात.
शुभ योग 2021
पाच वर्षा नंतर रविवार ह्या दिवशी करवा चौथ येत आहे. 8 ऑक्टोबर 2017 रविवार ह्या दिवशी हे व्रत होते ह्या वर्षी 24 ऑक्टोबर 2021 रविवार ह्या दिवशी हे व्रत आहे. रविवार हा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे. सूर्य देव आरोग्य व दीर्घायुष्य प्रदान करतात. ह्या वर्षी महिलानी सूर्य देवाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुषाची प्रार्थना करावी. महिलानी शुभ मुहूर्त वर पूजा केल्यास त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
शुभ मुहूर्त:
रोहिणी नक्षत्रमध्ये चंद्र दिसला की पूजा करावी. कृष्ण पक्षची तिथी चतुर्थी ह्या वर्षी 24 ऑक्टोबर 2021 रविवार सकाळी 3 वाजून 1 मिनिट सुरू होणार ते 25 ऑक्टोबर 2021 सकाळी 5 वाजून 43 मिनिट पर्यन्त राहणार. तसेच चंद्र दर्शन रात्री 8 वाजून 11 मिनिट ला होणार आहे. पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त 24 ऑक्टोबर 2021 संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिट पासून 8 वाजून 51 मिनिट पर्यन्त आहे.
करवा चौथ व्रत पूजा विधी:
सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर स्नान करा. त्यानंतर थोडे भोजन करून पाणी प्या मग श्री गणेशजीची पूजा करून निर्जल व्रतचा संकल्प करा. मग चंद्रोदय होई पर्यन्त काहीसुद्धा खायचे प्यायचे नाही. संध्याकाळी सर्व देवांची स्तापना करून त्यामध्ये करवा म्हणजेच दिवा ठेवा. एका थालीमध्ये धूप, दीप, चंदन, रोली, सिंदूर ठेवा व तुपाचा दिवा लावावा. पूजा चंद्रोदय होण्याच्या अगोदर एक तास करावी. मग चंद्र दर्शन करून आपल्या पतीच्या हातांनी पाणी ग्रहण करून मग उपवास सोडावा. त्या अगोदर चाळणी उभी धरून त्यामध्ये दिवा लावून चंद्र दर्शन करून आपल्या पतीचे मुख पहावे मग पाणी ग्रहण करावे.