करवा चौथ व्रत पूजेसाठी कहानी
करवा चौथ 2021 कार्तिक मास कृष्ण पक्ष चतुर्थी 24 ऑक्टोबर 2021 रविवार ह्या दिवशी आहे.ह्या दिवशी विवाहित महिला खूप सुंदर साज शृंगार करून पूर्ण दिवस उपवास करतात. करवा चौथ ह्या दिवसाची वर्षभर महिला वाट पहात असतात. प्रतेक सणाच्या मागे काहीना काही महत्व असते किंवा काही गोष्ट असते. त्याच बरोबर काही ज्योतिष शास्त्र सुद्धा आहे. करवा चौथ पूर्णिमाचा चौथा दिवस आहे. ह्या दिवशी महिला पूर्ण दिवस उपवास करून आपल्या पतीचे सर्व चांगले व्हावे म्हणून प्रार्थया करतात मग सण साजरा करतात. अविवाहित मुली चांगला पती मिळावा म्हणून उपवास करतात.
The Karwa Chauth Vrat Katha 2021 can of be seen on our YouTube Channel Karwa Chauth 2021 Kahani for Ladies
करवा चौथ कहाणी:
करवा चौथ ची कहाणी अशी आहे. एक राजा होता त्याचे नाव सत्यवान व त्याची पत्नी सावित्री. राजानी युद्धात सर्व गमावले होते. त्याच बरोबर आपले प्राण सुद्धा गमावले होते. त्याचा मृत्यू जेव्हा यमराज घेऊन चालला होता तेव्हा सावित्रीच्या प्रबल इच्छाशक्तिने व तिचा संकल्प इतका शक्तिशाली होता की त्यामुळे तिच्या पतीचे प्राण परत आले व त्याचा आत्मा परत त्याच्या शरीरात आला. त्यालाच करवा चौथ म्हणतात. अश्याच काही अजून प्राचीन कथा आहेत,
आपण आपले सर्व सण साजरे करा उपवास केला तर चांगले जेवण बनवून उपवास सोडा. ह्यालाच जीवन म्हणतात. आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा आपले शरीर शुद्ध होते. जेव्हा शरीरातील विश निघून जाते तेव्हा मन ताजे तवाने होते. तेव्हाच आपण आपल्या जीवनातील काही लक्ष प्राप्त करणार असाल तर ते करू शकता. प्रतेक काम श्रद्धाने करा प्रसन्न मनाने करा. आपले मन दुसरी कडे व आपण काही दुसरेच करीत आहोत असे करू नका. त्यामुळे आपला काही सुद्धा फायदा होणार नाही. उपवास केलयामुळे शरीराला आराम सुद्धा मिळतो.
आपल्या विवाहिक जीवनात मधुरता आणणारा करवा चौथ हा दिवस आहे. विवाहित महिला आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत करतात. तसेच अविवाहित महिला किंवा मुली चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात.
आज येथे आम्ही करवा चौथ ह्या दिवशी कोणती कहाणी आईकावी हे सांगत आहोत.
करवा चौथ ची कहाणी अशी आहेकी, देवी करवा आपल्या पती बरोबर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर राहात होती. एक दिवस करवाचे पती नदीमध्ये स्नान करण्यासाठी पाण्यात उतरले तेव्हा एकदम एक मगर मच्छ तेथे आली व करवाच्या पतीचा पाय ओढून नदीमध्ये खेचू लागली. करवाच्या पतीला त्याचा मृत्यू डोळ्या समोर दिसत होता मग तो करवाला हाका मारू लागला. करवा पळतच नदीच्या काठी आली व तिने पाहिले की मगरमच्छ तिच्या पतीला खेचत होता. तिने ताबडतोब एक कच्चा धागा घेऊन मगरमच्छला झाडाला बांधले करवा ही सात्विक स्त्री होते त्यामुळे तिच्या कच्च्या धागाने सुद्धा त्या मगरीचे प्राण धोक्यात आले. आता करवाचे पती व मगरमच्छ दोघांचे प्राण संकटात आले होते.
करवा ने यमराज चा धावा सुरू केला व आपल्या पतीचे प्राण वाचवायला सांगून मगरमच्छला मृत्यू दंड द्यायला सांगितले. तेव्हा यमराज म्हणाले की मी असे करू शकत नाही कारणकी मगर मच्छचे अजून काही वर्ष शिल्लक आहेत व तुझ्या पतीचे आयुष्य संपले आहे. मग करवा खूप क्रोधित झाली व रमराजना म्हणाली जर तू असे केले नाहीतर मी तुला शाप देईन. यमराज भयबीत झाले व त्यांनी करवा जसे म्हणला तसे करून मगरमच्छल मृत्यूदंड दिला व करवाच्या पतीचे प्राण परत केले. म्हणूनच विवाहित महिला करवाचौथ च्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य साठी प्रार्थना करतात. व आपल्या सुहागची रक्षा करायला सांगतात.
करवा माता च्या सारखेच सावित्रीने सुद्धा आपल्या पतीचे प्राण कच्या धागाने वटवृक्ष च्या खाली बांधून ठेवले होते. कच्या धाग्यामध्ये एवहडे प्रेम व विश्वास असते की यमराज ना सावित्रीच्या पतीचे प्राण आपल्या बरोबर नेता आले नाही व सावित्रीच्या पतीचे प्राण परत करावे लागले व तिला वरदान मिळाले की तिचे सुहाग नेहमी राहील व दोघेजण सुखात नांदताल.