धनत्रयोदशी धनतेरस 2021 मुहूर्त पूजा विधि महत्व व मंत्र
हिंदूधर्म मध्ये दिवाळीह्या सणाला विशेष महत्व आहे. दिवाळीच्या अगोदर धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. ह्या वर्षी धनत्रयोदशी 2 नोव्हेंबर 2021 मंगळवार ह्या दिवशी आहे.
The Dhantrayodashi Dhanteras 2021 Muhurat Puja Vidhi Importance And Mantra can of be seen on our YouTube Channel Dhantrayodashi Dhanteras 2021 Muhurat Puja Vidhi Importance And Mantra
धनत्रयोदशी हा दिवस का साजरा केला जातो:
धार्मिक मान्यता अनुसार जेव्हा भगवान धन्वंतरि प्रकट झाले होते तेव्हा त्यांच्या हातात अमृत कलश होता. ह्या दिवशी भगवान धन्वंतरि ह्याची पूजा करणे फार शुभ मानले जाते ह्या तिथीला धन्वंतरि जयंती किंवा धनत्रयोदशी ह्या नावांनी संबोधले जाते. भगवान धन्वंतरि हयाना भगवान विष्णुचे रूप मानले जाते. ह्या दिवशी भांडी व दागिने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
तसेच ह्या दिवशी संध्याकाळी दाराच्या बाहेर यमराज ह्याच्यासाठी एक दिवा लावतात. त्यामुळे यमराज खुश होतात व परीवारातील व्यक्तीचा अकाली मृत्यू होत नाही.
धनत्रयोदशी ह्या दिवसापासून दिवाळीचे दीवे लावतात. तसेच ह्या दिवशी झाडू खरेदी करतात. झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात. ह्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणला की घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
महालक्ष्मीची पूजा का करतात:
असे मानले जाते की धनत्रयोदशी ह्या दिवशी भगवान धन्वंतरि व माता लक्ष्मी ह्यांची पूजा केली जाते त्यामुळे आपल्या जीवनात धनाची कमतरता नाही राहणार ह्या दिवशी भगवान कुबेर ह्यांची सुद्धा पूजा केली जाते.
धनत्रयोदशी 2021 शुभ मुहूर्त-
धनत्रयोदशी तिथि 2021- 2 नोव्हेंबर मंगळवार
धनत्रयोदशी पूजेचा शुभ मुहूर्त- संध्याकाळी 5 वाजून 25 मिनट पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत
प्रदोष काळ- संध्याकाळी 05:39 पासून 20:14 मिनिट पर्यन्त
वृषभ काळ- संध्याकाळी 06:51 पासून 20:47 पर्यंत
धनत्रयोदशी पूजा विधि-
- सर्वात पहिले चौरंगावर लाल रंगाचा कपडा घाला. त्याच्या भोवती रांगोळी काढावी.
- आता त्यावर गंगाजल शिंपडून चौरंगावर गहू तांदूळ ची रास ठेवावी. त्यावर भगवान धन्वंतरि, माता महालक्ष्मी व भगवान कुबेर चा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा।
- आता तुपाचा दिवा लाऊन अगरबत्ती लावा
- त्यानंतर लाल रंगाचे फूल अर्पित करा.
- त्यानंतर आपण ह्या दिवशी ज्या धातूची भांडी किंवा दागिने खरेदी केले असतील ते ठेवा
- लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी चालीसा, लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र व कुबेर स्तोत्र चे वाचन करा
- धनत्रयोदशीची पूजा करताना माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत रहा व मिठाईचा नेवेद्य दाखवावा.
भगवान कुबेर व लक्ष्मी माता मंत्र
धनत्रयोदशी ह्या दिवशी ह्या मंत्राचा जप केल्यास अपार ध्यान प्राप्ती होते असे म्हणतात.
ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥