विटामीन B-12 कमी लक्षण व घरगुती उपाय
आपल्या शरीरातील विटामीन B-12 कमी झाले त्याची लक्षण घरगुती उपाय काय आहेत ते पाहूया.
आपल्या शरीरातील विटामीन B-12 हे फार महत्वपूर्ण असते. विटामीन B-12 कमी झालेकी बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी आपल्या शरीरातील विटामीन B-12 कमी झालेतर कधी सुद्धा दुर्लक्ष केले नाही पाहिजे,
The Vitamin B 12 Deficiency of be seen on our YouTube Channel Vitamin B 12 Deficiency Symptoms And Home Remedies
साधारण पणे असे दिसून येते की जे शाकाहारी लोक आहेत त्याचे शरीरातील विटामीन B-12 कमी असते.
आपण पहिल्यांदा आपल्या शरीरातील विटामीन B-12 कमी झाले आहे त्याची लक्षण काय आहेत ते पाहूया. व त्याच बरोबर जर ते कमी झाले तर त्याची काय परिणाम होतात ते पाहू या. त्याच बरोबर त्याचे घरगुती उपाय काय आहेत ते पाहूया.
तज्ञानचे म्हणणे असे आहे की आपल्या शरीरातील विटामीन B-12 कमी झालेतर एनीमिया, थकवा, चिडचिड होणे, मुंग्या येणे, हात-पाय आखडणे, तोंडात छाले पडणे, पोट साफ न होणे, मळमळणे होऊ शकते.
शरीरातील विटामीन B-12 कमी होण्याची लक्षण:
स्कीन पिवळी पडते, जिभेवर दाणे येणे किंवा लाल रंगाची होणे, डोळ्याची दृष्टी कमी होणे, तोंडात छाले पडणे, स्मरणशक्ती कमी होणे, डिमेंशिया, थकवा येणे किंवा सुस्ती येणे, डिप्रेशन
येणे, डोके दुखी, भूक कमी लागणे, हाता पायाला थंडी वाजणे,
विटामीन B-12ची कमतरता कशी दूर करायची:
विटामीन B-12 हे मासे, चिकन, मटन व अंडी ह्या मध्ये जास्त प्रमाणात असते. जे शाकाहारी लोक आहेत त्याना विटामिन बी 12 ची कमतरता होते. हे विटामीन B-12 हे पशू खाद्य मध्ये मिळते. म्हणूनच जे लोक पशू खाद्य सेवन करत नाहीत त्यांना विटामीन B-12 ची कमतरता होते. त्यांनी विटामिन बी 12 सप्लीमेंट्स सेवन केले पाहिजे.
शाकाहारी लोकांचे विटामिन बी 12 कमी झालेतर ह्या पाच खाद्य पदार्थाचे सेवन करू शकतात.
विटामिन बी 12 हे आपल्या रक्तातील रेड ब्लड सेल्स निर्माण करण्यास खूप आवश्यक आहे. ते मांसाहारी जेवाणांत आपल्याला मिळते. म्हणूनच शाकाहारी जेवणात ह्याची कमी मिळते.
विटामिन बी 12 ही आपल्या शरीराला आवश्यक आहे जसे बाकी विटामीन व मिनरलस आहेत तसेच. विटामिन बी 12 ही असे आहे की ते आपल्याला आहारातूनच मिळते. व ते अगदी आवश्यक आहे. व ते आपल्याला मांसाहारी जेवणातून मिळते. म्हणून जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्या मध्ये विटामिन बी 12 ची कमी राहते. तर मग त्यासाठी खाली दिलेल्या 5 फूड आईटमस सेवन केल्याने त्याची कमी भरून निघते.
डेयरी प्रोडक्ट्स (Dairy Products) : डेयरी प्रोडक्ट्स म्हणजे दुधा पासून बनवलेले पदार्थ. दुधामद्धे म्हणजेच 250 ml मध्ये विटामिन बी 12 1.2 – 2.4 एवहडे असते. म्हणूनच आपण दुधापासून बनवलेले पदार्थ दही, पनीर, लोणी, किंवा चीज ह्याचे सेवन जरूर करावे. पनीरमध्ये जास्त प्रमाणात विटामिन बी 12 आहे. त्याच बरोबर कॉटेज चीज़ मध्ये सुद्धा आहे. त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून सेवन करू शकता.
फोर्टीफाइड सीरियल्स (Fortified Cereals): तसे पाहिलेतर आपल्याला आपल्या जेवणातून विटामीन बी 12 मिळते. पण जे शाकाहारी लोक आहेत त्यांना ह्याची कमतरता जाणवते. त्यासाठी त्यांनी नाश्तामध्ये गहू, तांदूळ, तेल, मीठ, दुधा पासून बनवलेले पदार्थ सेवन करावे. किंवा डाळी पासून बनवलेले पदार्थ सेवन करावे.
सोया प्रोडक्ट्स (Soy Products): सोया प्रोडक्टस सुद्धा फायदेशीर आहेत. त्यातून विटामीन बी 12 बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच त्यामध्ये प्रोटिन सुद्धा आहे. सोया मिल्क, किंवा टोफू, किंवा सोया चंक वापरुन बनवलेले पदार्थ सेवन करावे.
ब्रोकली: आपण आपल्या जेवणात ब्रोकली सेवन करू शकता. ब्रोकलीमध्ये विटामिन बी 12 व त्याच बरोबर फोलेट आहे जे शरीरातील हीमोग्लोबिन कमी होऊ देत नाही.
अंडी: थंडीच्या सीझनमध्ये अंडी जरूर सेवन करावी. त्यामध्ये प्रोटिन व विटामिन बी12 आहे. ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.