तुलसी विवाह तुळशीचे लग्न 2021 महत्व, शुभ मुहूर्त व पूजा विधी
प्रतेक वर्षी कार्तिक माहिन्यात शुक्ल पक्ष एकादशी ह्या तिथीला विष्णु भगवानचे रूप शालिग्राम व देवी माता तुळशी ह्याचा विवाह करतात. ह्या दिवसाला देवउठाउनी एकादशी ह्या नावाने सुद्धा संबोधले जाते. ह्या दिवशी विष्णु भगवान चार महिन्यानंतर आपल्या योगनिद्रा मधून जागे होतात. देवी तुळशी भगवान विष्णुना अतिप्रिय आहे.
The Tulsi Vivah 2021 Importance, Pooja Muhurth And Puja Vidhi of be seen on our YouTube Channel Tulshiche Lagn
The text Tulsi Vivah Katha Can be seen here: Katha
धार्मिक मान्यता अनुसार योगनिद्रा मधून जागे झाल्यावर सर्व प्रथम हरिवल्लभा म्हणजेच तुळशीची हाक आईकतात. तुळशी विवाह बरोबरच विवाह च्या तिथी सुरू होतात. चला तर मग पाहूया ह्यावर्षी तुलसी विवाह कधी आहे म्हणजेच त्याची सुरवात कधी आहे व तुळशी विवाह ह्या दिवसाचे महत्व व पूजाविधी.
आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळसला खूप महत्व आहे. प्रतेक घरासमोर किंवा बाल्कनीमध्ये आपण तुळशीचे रोप लावतो. तुळशीला आपण देवच मानतो. रोज तुळशीच्या समोर सडा रांगोळी काढून दिवा लावला जातो. त्यामुळे माता तुळशीची कृपा नेहमी आपल्यावर राहते. कार्तिक महिन्यामध्ये रोज तुळशीच्या समोर दिवा लावल्याने भगवान विष्णूचे आशीर्वाद आपल्याला मिळतात.
तुलसी तुळशी विवाह महत्व:
तुलसी विवाह देवउठनी एकादशी ह्या दिवशी होतो. ह्या दिवसा पासून चातुर्मासची समाप्ती होते व तुलसी विवाह बरोबर सर्व शुभकार्य व विवाह आरंभ होतात. धार्मिक मान्यता के अनुसार ह्या दिवशी जे तुलसी विवाह संपन्न करतात त्यांच्यावर भगवान विष्णु ह्यांची कृपा नेहमी राहते व त्यांचे जीवन नेहमी सुखी समाधानी राहते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते. त्याच बरोबर माता तुळशीची आपल्या घरावर सदैव कृपा राहून सुख समृद्धी मिळते. ह्या दिवशी शालिग्राम व माता तुळशीचा विवाह करतात म्हणून महिला आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करून अखंड सौभाग्य मिळाव म्हणून उपवास करतात.
एकादशी तिथी समाप्ती 15 नोव्हेंबर सकाळी 6 वाजून 39 मिनिट व द्वादशी आरंभ 15 नोव्हेंबर 2021 सोमवार
द्वादशी तिथि आंरभ-15 नोव्हेंबर 2021 दिन सोमवार सकाळी: 06 वाजून 39 मिनट पासून
द्वादशी तिथि समाप्त – 16 नोव्हेंबर 2021 मंगळवार सकाळी 08 वाजून 01 मिनट पासून
तुलसी विवाह पूजा विधि:
सर्व प्रथम एका लाकडी चौरंगवर एक स्वच्छ कपडा घालून त्यावर तुळशीची कुंडी ठेवा.
दुसऱ्या चौरंगावर एक स्वच्छ कपडा घालून शालीग्रामची स्थापना करा.
आता त्यांच्या जवळ एक कलश पाणी भरून त्यावर 5-7 आंब्याची पाने ठेवा. कलशावर हळद-कुकुची पाच बोट उंटवावी.
मग तुळशीच्या कुंडीला गेरू लावून रंगवा.
आता दोन्ही चौरंगा समोर तुपाचा दिवा लाऊन हळद-कुंकू लावा.
मग ऊसाच्या सहयाणी मंडप बांधा व तुळशीच्या रोपावर लाल रंगाची चुनरी घाला. तुळशीला बांगड्या, बिंदी, फुलाची वेणी, कापसाचे वस्त्र व सौभाग्य अलंकार घालून सजवा.
तुळशीची ओटी भरण्यासाठी हिरव्या रंगाचे कापड, अक्षता, हळद-कुंकू, पान सुपारी, हळकुंड, बदाम, केळी मोसंबी, व नारळ ठेऊन ओटी भरावी. मग समईचे पूजन करावे. आता तुळशीला मुंडवळ्या बांधाव्या.
श्री कृष्णाची प्रतिमा घेऊन पूजा करून हळद-कुंकू, अक्षता फुले, हार घालून पूजन करावे. तुळशी वृंदावनला हार घालावा.
तुळशी वृंदावन समोर एक पाट ठेवून पाटाला सुशोभीत करावे व श्री कृष्णची प्रतिमा ठेऊन मध्ये अंतर पाट ठेवून मंगल अष्टक म्हणावे. आरती म्हणून प्रसाद म्हणून मिठाई, फराल व बतासे वाटतात।