काळे तीळ सेवनाचे औषधी गुणधर्म फायदे
काळे तीळ सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. तीळ ही तीन प्रकारचे असतात एक म्हणजे पांढरे तीळ, दुसरे काळे तीळ व तिसरे लाल तीळ होय. आयुर्वेदामध्ये काळे तीळ ही सर्वश्रेष्ठ मानले जातात. औषधे बनवण्यासाठी काळे तीळ ही सर्वात जास्त वापरले जातात. त्याच्यामध्ये कॅल्शियम ही जास्त प्रमाणात असते. तसेच त्याच्या पासून तेल बनवून त्याचा बऱ्याच प्रमाणात उपयोग करू शकतात. खासकरून लहान मुलांसाठी त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो. काळे तीळ सेवन केल्याने पुरूषांचे वीर्य वाढून कमजोरी सुद्धा कमी होते.
The Black Seeds (Til) Benefits For Hair Skin Immunity Piles Teeth of be seen on our YouTube Channel Black Sesame Seeds (Kale Til)
काळे तीळचे औषधी गुणधर्म:
काळे तीळ सेवन केल्याने ताकत मिळते:
काळे तीळमध्ये लैसीथिन द्रव्य आहे त्यामुळे मेदूच्या पेशी व स्नायूची ताकद वाढते. त्याच बरोबर त्यामध्ये विटामीन बी कॉम्प्लेक्स व प्रोटिन भरपूर प्रमाणात आहे. काळे तीळचे सेवन म्हणजे वाढत्या वया वरती सुद्धा असरदार आहे.
केसान संबंधित समस्या:
लवकर केस पांढरे होणे, गळणे, टक्कल पडणे ह्या समस्यासाठी काळे तीळ फायदेमंद आहेत. त्याच्या सेवनाने केस मुलायम, मजबूत व काळे होतात.
रोग प्रतिकार शक्ति वाढते:
रोग प्रतिकार शक्ति वाढण्यासाठी 1-2 महीने 2 चमचे काळे तीळ रोज चावून खाण्याने किंवा त्याचे पदार्थ बनवून सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ति वाढते. त्याच्या तेलानी मालीश केल्याने सुद्धा उपयोग होतो.
टाचाना भेगा पडणे:
जर पायाच्या टाचाना भेगा पडल्यातर त्यासाठी एक भाग पिवळे मेण व चार भाग काळे तीळचे तेल गरम करून त्याची पेस्ट बनवून थंड झाल्यावर टाचाना लावल्यास आराम मिळतो.
मूळव्याध किंवा पाईल्स:
मूळव्याधच्या कोणत्यासुद्धा स्टेजमध्ये तीळ वाटून त्यामध्ये लोणी मिक्स करून सेवन केल्याने फायदेशीर होते.
मजबूत दांत:
तीळ चावून सेवन केल्यास दातांच्या हिरड्या मजबूत होतात. व ते सेवन केल्याने त्यावर थोडे पानी पिले की दांत मजबूत होतात. जर पायरिया हा रोग झाला असेलतर तिळाच्या तेल तोंडांमद्धे 2-3 मिनिट ठेवून मग त्यानीच गुळण्या केल्याने आराम मिळतो.
गुडघे दुखी:
500 ग्राम तेलामद्धे 5-5 ग्राम मोहरी, ओवा, सुंठ, व लसूण मिक्स करून उकळी आणावी मग तेल गाळून त्यांनी हलक्या हातांनी मालीश करावे.
हाय ब्लड प्रेशरवर उपयोगी:
ज्याना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांच्या साठी काळे तीळ फायदेमंद आहे. त्याच्या मुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
कॅन्सरसाठी फायदेमंद:
तीळमध्ये विटामीन C आहे. तसेच एंटीऑक्सीडेंटचे गुण आहेत त्यामुळे ल्यूकेमिया, स्तन कॅन्सर, व प्रोस्टेट कॅन्सर होण्या पासून बचाव करते.