अपार धन दौलत समृद्धीसाठी आपले घर असे ठेवा
आपल्याला अपार धन-दौलत, समृद्धी, सुख, शांती पाहिजे असेलतर आपल्या घराचे चित्र म्हणजेच आपल्या घरातील गोष्टींवर लक्ष ठेवा. सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या घरातील नकारात्मक चित्र काढून टाका. म्हणजे अशा प्रकारची चित्र ताजमहाल, नट, नट्याचे फोटो किंवा पोस्टर, जनावरं ह्याची चित्र किंवा फ्रेम, व त्याच बरोबर नकारात्मक झाड किंवा त्यांची चित्र.
The Apar Dhan Daulat Samruddhi Gharguti Sope Upay can be seen on our YouTube Channel Apar Dhan Daulat Samruddhi Gharguti Sope Upay
आपल्या घरांमध्ये बेडरूम म्हणजेच आराम करायची खोली, स्वयंपाकघर, अभ्यासाची खोली, पूजाघर व पाहुण्यांसाठी खोली असेल. तर आपण प्रतेक खोलीमध्ये एक एक चित्र लावा. त्यापेक्षा जास्त चित्र लावू नका. एक लक्षात ठेवा की आपण नेहमी खुश रहा त्यामुळे धनप्राप्ती होऊन आपल्याला धन प्राप्तीचा मार्ग मिळेल त्याच बरोबर आपण धनवान बनण्याचे स्वप्न पहा.
घराचे मुख्य दार किंवा दरवाजा:
आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशजीची म्हणजेच गणपतीची फ्रेम लावा. उजव्या व डाव्या बाजूला शुभ लाभ असे लिहा. त्याच बरोबर चांगली पाना फुलांची फ्रेम लावा.
एक लक्षात ठेवा की दरवाजाच्या बाहेर आपल्या गुरुची किंवा देवी देवतांची चित्र लावू नये. वास्तु शास्त्र नुसार ते बरोबर नाही. पण श्री गणेश गणपती ह्याची फ्रेम किंवा फोटो लावावा.
आपल्या घरचा मुख्य दरवाजा दोन पाटांचा हवा.
खिडकी:
आपल्या खिडकीला चांगले सजवून पडदा लावावा.
खिडकीच्या जवळ वेलबुट्टीचे चित्र पाहिजे. किंवा रांगोळीचे चित्र पाहिजे.
पाहुण्यांची खोली:
घरामध्ये पाहुण्यांसाठी म्हणजेच गेस्ट रूम असेलतर तेथे हंस च्या जोडीची मोठी तसवीर म्हणजेच फ्रेम लावावी त्यामुळे अपार धन दौलतची प्राप्ती वाढते.
त्याच बरोबर घरामध्ये स्वच्छ कॉर्नरला धनाची रास असलेले छोटेसे चित्र लावावे.
गृहकलह किंवा वैचारिक मतभेद पासून वाचण्यासाठी हसत मुख असलेले पूर्ण परिवाराचे चित्र लावावे.
जर आपण दुसऱ्या कोणाचे हसत मुख असलेले फॅमिलीचे चित्र लाऊ शकत नसले तर आपल्या फॅमिलीचे चित्र लावावे. पान ते चित्र किंवा फ्रेम दक्षिण-पश्चिम ह्या दिशेला कोर्नरला लावावे.
समुद्र किनारे पळणारे 7 घोडे ची फोटो फ्रेम पूर्व दिशेला लावावी पण फ्रेम लावण्याच्या अगोदर वास्तु शास्त्रा नुसार विचरून लावावी.
पूजा घर:
पूजा घर मध्ये किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लक्ष्मी अथवा कुबेर भगवानचा फोटो लावावा.
बसलेल्या स्थितिमध्ये श्री हनुमानजीनची पूजा केल्यास सर्व प्रकारचे संकट दूर होतात.
गरुडवरती बसलेले श्री विष्णु व माता लक्ष्मी बरोबर असलेले चित्राची पूजा केल्याने धन-दौलत व समृद्धी मिळते.
घरामध्ये दक्षिण दिशेच्या भिंतीवर लाल रंगाचे श्री हनुमानजीनचे चित्र लावल्याने दोन लाभ होतात. पहिला लाभ म्हणजे जर तुमचा मंगळ हा ग्रह अशुभ असेलतर तो शुभ होतो व दूसरा म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणत्यासुद्धा गोष्टीचे भय असेलतर ते निघून जाते.
स्वयंपाकघर:
स्वयंपाकघरमध्ये ओट्याच्या वरती सुंदर फळ व भाज्यांचे चित्र लावावे.
*अन्नपूर्णा माताचे चित्र लावल्याने घरात सुख समृद्धी येते.
*जय घरातील स्वयंपाकघर दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय कोर्नरला नसेलतर वास्तु दोष दूर करण्यासाठी स्वयंपाकघर मध्ये उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान कोर्नरला शेंदरी रंगाचा गणपतीचा फोटो लावावा.
वास्तु शास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय कोर्नरला असणे शुभ असते. जर तसे नसेल तर घरातील महिलांची तबेत वरती परिणाम होतो. त्याच बरोबर अन्न धान्याची हानी होते.
जर आपले स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेलतर स्वयंपाकघरमध्ये यज्ञ करत असलेले ऋषिचा फोटो लावावा.
अभ्यासाची खोली किंवा रूम:
जर मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेलतर मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये माता सरस्वती किंवा वेदव्यास किंवा अभ्यास करत असलेल्या
मुलाचा फोटो लावावा.
घराच्या उत्तर दिशेला अभ्यास करताना मुलाचे तोंड पाहिजे. व फोटो सुद्धा उत्तर दिशेला पाहिजे.
त्याच बरोबर हिरव्या रंगाचा पोपट असलेला फोटो लावावा त्यामुळे मुलाचे अभ्यासात लक्ष लागेल.
घरातील उत्तर भिंतीवर हिरवी झाडे किंवा पोपट किंवा उडणारे पक्षी ह्याचे फोटो लावावे त्यामुळे अभ्यासातील एकाग्रता वाढेल.
त्याच्या व्यतिरिक्त मोर, वीणा, पेन, पुस्तक, हंस अथवा मासा ह्याची पण चित्र लावू शकता.
शयन कक्ष म्हणजेच बेडरूम:
जर पति व पत्नी मध्ये तनाव आहे व काही कारणाने त्यांच्यामध्ये प्रेम नसेल तर आपल्या बेड रूममध्ये राधा-कृष्ण ची सुंदर फ्रेम लावावी.
जर तुम्ही राधा कृष्णची फ्रेम लावू शकत नसाल तर सुंदर हंसाच्या जोडीची फ्रेम लावावी.
ह्याच्या व्यतिरिक्त आपण हिमालय, शंख किंवा बासुरीचे पण चित्र लाऊ शकता. पण ह्या पैकी एकच चित्र लावावे.
जर आपले शयन कक्ष अग्निकोण मध्ये आहे तर पूर्व मध्य भितीवर शांत समुद्राची तसवीर लावावी.
आपल्या बेडरूममध्ये चुकूनसुद्धा कोणतेही पाण्याचे चित्र लाऊ नये. कारण त्याचे संकेत म्हणजे पाती पत्नीमध्ये तिसरे कोणी असा त्याचा अर्थ होतो,
शौचालय:
जर आपले शौचालय ईशान कोणमध्ये आहे तर आपल्या धनाची हानी होते. व घरात अशांती होते. त्यासाठी शौचालयच्या बाहेर वाघाची शिकार करतानाची फ्रेम लावावी
शौचालयमध्ये बसण्याची जागा जर दक्षिण अथवा पश्चिम दिशेला असेल तर चांगले.
स्नानघर:
स्नानघर मधील वास्तुदोष दूर करण्यासाठी निळ्या रंगाची बादलीचा उपयोग करावा.
स्नानघरमध्ये कोणती सुद्धा फ्रेम लावणे बरोबर नाही फक्त एक छोटासा आरसा लावावा.