लाल द्राक्षे डोळ्याच्या आरोग्यापासून ते त्वचेच्या आरोग्या पर्यन्त फायदेशीर जाणून घ्या त्याचे फायदे
आपण रोज फळ सेवन करतो. फळ खण्याने आपले आरोग्य व त्याच बरोबर आपले मन ताजे तवाने राहते. त्याच बरोबर आपल्याला एनर्जी मिळते.
आता द्राक्षाचा सीझन चालू झाला आहे. आपण बाजारात गेलो की आपल्याला हिरवी, काळी किंवा लाल रंगाची द्राक्ष दिसतात. पण आपल्याला माहीत आहे का की लाल रंगाची द्राक्ष आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितावाह व पौस्टिक आहेत. व त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला किती फायदे होऊ शकतात.
The Red Grapes Health Benefits For Eye To Skin can be seen on our YouTube Channel Health Benefits of Eating Red Grapes
लाल रंगाची द्राक्ष खूप रसाळ असतात. त्याच बरोबर मोहक व आकर्षक दिसतात. हिरवी, काळी व लाल द्राक्ष ह्यामध्ये लाल रंगाची द्राक्ष जास्त फायदेमंद आहेत. लाल रंगाची द्राक्ष आपल्या डोळ्याचे आरोग्य, हृदयाच्या आरोग्या पासून स्कीन महणजेच त्वचाच्या आरोग्या पर्यन्त फायदेमंद आहेत. नेहमी एक लक्षात ठेवा की आपण सीझन प्रमाणे फळ सेवन केलीतर आपले आरोग्य नेहमी चांगले राहण्यास मदत मिळते. लाल द्राक्ष म्हणजे आपल्या साठी सुपर फूड आहे.
1) डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेमंद:
लाल द्राक्ष डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत. ऑक्सीडेटिव स्ट्रेस व डोळ्यांची सूज हे मुख्य कारण आहे. ऑक्सीडेटिव स्ट्रेसमुळे डोळ्यांचे रेटिना प्रॉब्लेम सुरू होतात ते लाल द्राक्ष सेवन केल्याने अश्या प्रकारचे प्रॉब्लेम होण्यास रोकतात. त्यामुळे आपली डोळ्याची दृष्टी सुधारते. त्याच बरोबर डोळ्याच्या आरोग्यासाठी जी पोषक तत्व लागतात ती त्यामध्ये आहेत तसेच मोतीबिंदू होण्यापासून बचाव होतो.
2. हाडे मजबूत होतात:
लाल द्राक्षमध्ये प्रोएंथोस्यानिडींस नावाचा पदार्थ आहे. त्यामुळे हाडे मजबूत बनतात. कॅल्शियम युक्त आहारा बरोबर लाल द्राक्षचे सप्लीमेंट घेतले तर आपल्या मास पेशी सुद्धा चांगल्या बनतात. अर्थराइटिस असणाऱ्याना सुद्धा लाल द्राक्ष सवनानी फायदा होतो. त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते.
3 कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते:
कोलेस्ट्रॉल वाढले की शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. ह्रदय रोग, डायबिटीज, ब्लडप्रेशर वाढते. म्हणून त्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणे जरुरीचे आहे. आपल्या आहारात लाल द्राक्ष शमिल केल्यास कोलेस्ट्रॉल संतुलित राहते. त्याच्या सेवनाने शरीरातील बैड कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होते. व गुड कोलेस्ट्रॉल (HDL) मध्ये वृद्धि होते.
4 ब्लड प्रेशरसाठी फायदेमंद लाल द्राक्ष:
द्राक्ष सेवन केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. किंवा द्राक्षाचा ज्यूस सेवन केल्याने व्यक्ति च्या ब्लड प्रेशर मध्ये सुधार होतो. त्याच बरोबर रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
5 ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते:
लाल द्राक्षमध्ये फ्लेवोनोइड्स व फेनोलिक एसिड आहे त्याच्या मुळे हृदय रोगा पासून बचाव होतो. द्राक्षामध्ये एंटीऑक्सीडेंटचे गुण आहेत. त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे गंभीर हृदय रोग होण्याचा धोका टळतो.
6 किडनी साठी फायदेमंद:
लाल द्राक्ष मध्ये एंटीऑक्सीडेंट व एंटी-इंफ्लेमेटरी गुण आहेत त्यामुळे किडनीच्या समस्या निर्माण होण्यास बचाव होतो. एंटीऑक्सीडेंट मुळे रक्त शुद्धी होते. त्यामुळेच किडनीच्या समस्या कमी होतात.
7 त्वचा साठी फायदेमंद लाल द्राक्ष:
लाल द्राक्ष एंटीऑक्सीडेंट सारखे काम करते. ते स्किन एजिंग व स्किन कॅन्सर होण्या पासून बचाव करते. त्यामध्ये पॉलीफेनोल आहे त्यामुळे त्वचा सनबर्न होण्या पासून वाचते. त्याच बरोबर स्कीन वरील दाग, धब्बे, पिंपल्स, वरती काम करते. त्याच बरोबर ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करून त्वचेचे रोग बरे करते.