टेस्टी साऊथ इंडियन स्टाईल इडली डोसा चटणी
इडली, डोसा किंवा उत्तपा ह्या डिश दक्षिण भागातील खूप लोकप्रिय डिश आहेत पण कालांतराने त्या सर्व भागात लोकप्रिय झाल्या आहेत. आपण नाश्तासाठी किंवा जेवणात सुद्धा अश्या प्रकारच्या डिश बनवतो. व सर्व जन खूप आवडीने खातात.
दक्षिण भगात इडली व डोसा बरोबर चटणी बनवतात ती आगळी निराळ्या पद्धतीने बनवतात. अगदी तशीच किंवा उडपी हॉटेलमध्ये जशी बनवतात अगदी तशीच आपण चटणी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो.
The South Indian Restaurant Style Idli- Dosa Chutney can be seen on our YouTube Channel South Indian Restaurant Style Idli- Dosa Chutney
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जाणसाठी
साहीत्य:
1 कप ओला नारळ (खोवून)
2-3 हिरव्या मिरच्या
7-8 लसूण पाकळ्या
1 टे स्पून पंढरपुरी डाळ
1 टे स्पून शेगदाणे (भाजून)
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
3 टे स्पून पाणी
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1 टे स्पून उडीद डाळ
1 टे स्पून चनाडाळ (पाहिजेतर घाला)
¼ टी स्पून हिंग
7-8 कडीपत्ता पाने
2 लाल सुक्या मिरच्या
कृती:
प्रथम नारळ फोडून खोवून घ्या किंवा त्याचे बारीक तुकडे करून घ्या. शेगदाणे भाजून घ्या. लसूण सोलून घ्या. कोथिंबीर कडीपत्ता धुवून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात नारळ, हिरवी मिरची, लसूण, पंढरपुरी डाळ, शेगदाणे, मीठ व थोडे पानी घालून ग्राइंड करून घ्या. लागले तर अजून थोडे पाणी घाला. शक्यतो आपण नारळ फोडून लगेच चटणी बनवतो तेव्हा नारळाचे पानी चटणी साठी वापरावे टेस्ट खूप मस्त येते. चटणी वाटल्यावर एका बाउलमध्ये काढून घ्या.
फोडणी करिता: फोडणीची वाटी गरम करायला ठेवा त्यामध्ये तेल घालून गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरे, उडीद डाळ, चनाडाळ घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये हिंग, कडीपत्ता व लाल सुकी मिरची घालून थोडे गरम करून फोडणी चटणीवर घाला. व मिक्स करून गरम गरम इडली किंवा डोसा बरोबर सर्व्ह करा.