घरामध्ये तमालपत्र जाळण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे व मनोकामना पूर्ती टोटका सुद्धा आहे
आपलयाला तमालपत्र हे माहीत आहेच. भारतामध्ये तमालपत्र हे स्वयंपाक करताना वापरले जाते. त्याच्या मुळे भाजी किंवा आमटीला चांगली चव येते. पण त्याचे अजून काही फायदे आहेत. ते जास्ती करून आपल्याला माहीत नाहीत.
The Amazing Health Benefits of Burning Bay Leaves At Home can be seen on our YouTube Channel Amazing Health Benefits of Burning Bay Leaves At Home
तमालपत्र जाळल्यामुळे त्याच्या धूरामुळे स्ट्रेस दूर होतो असे मानले जाते. त्याचे अनगिनत औषधी फायदे आहेत. तमालपत्र जाळल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
एक तमालपत्र एका भांड्यात ठेवून ते आपल्या घरामध्ये किंवा खोलीमध्ये जाळले तर त्याचे चमत्कार आपल्याला पाहायला मिळतील. तमालपत्र जाळल्यामुळे फक्त त्याचा सुगंधच दरवलेल नाहीतर त्याच्या मुळे आपल्या मनावरील ताण सुद्धा कमी होईल.
आपले घर सुगंधित ठेवण्यासाठी आपण महागडे निरनिराळे रूम फ्रेशनर आणतो व घरभर मारतो. पण ते काम एक तमालपत्र सुद्धा करू शकते. तमालपत्रमध्ये रूम फ्रेशनरचे भरपूर गुण आहेत. जुन्या काली लोक रूम फ्रेशनर म्हणून तमालपत्र जाळायचे.
तमालपत्र जाळण्याने डोके शांत राहून स्ट्रेस दूर होतो. त्याच्या जाळण्याच्या सुगंधाने थकवा व चिडचिड दूर होते. त्याच बरोबर त्याच्या धुराच्या सुगंधाने आपली रोग प्रतिकार शक्ति वाढते. व आजूबाजूचे दूषित कण नष्ट होतात.
त्याच बरोबर घरातील झुरळ किडे मरून जातात किंवा पळून जातात. रोज एक तमालपत्र जाळून खोलीत किंवा स्वयंपाक घरात ठेवावे. पण एक लक्षात ठेवा एका वेळी एकच तमालपत्र जाळावे.
आपल्याला माहीत आहे का एक तमालपत्र जाळून आपण आपली मनोकामना किंवा इच्छा सुद्धा पूर्ण करू शकता.
एक तमालपत्र घ्या पण ते अगदी चांगले पाहिजे ते कुठे सुद्धा तुटलेले नसावे. मग एक लाल शाईचे पेन घेऊन तमालपत्रवर लाल शाईच्या पेनने आपली मनोकामना लिहावी. मग दोन्ही हाताच्यामध्ये ते पान घ्यावे व आपली मनोकामना मनातल्या मनात लिहावी.
आता ते पान एका स्टीलच्या प्लेटमध्ये मेणबत्ती लाऊन त्यावर ते पान ठेवून जाळावे. मग प्लेटमध्ये पानाची राख होईल ती प्लेट घराबाहेर नेऊन ती राख आकाशाच्या दिशेने फुंकर मारून उडवावी. राख वरच्या बाजूला जायला पाहिजे. तसे केल्याने आपली मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.