दत्त जयंती दत्तात्रय जयंती 2021 तारीख, पूजा, कथा, महत्व व मंत्र
मार्गशीष पूर्णिमा ह्या दिवशी दत्त जयंती आहे. म्हणजेच ह्या वर्षी 18 डिसेंबर 2021 शनिवार ह्या दिवशी दत्त जयंती आहे. ह्या दिवशी श्री दत्तात्रय भगवान ह्यांचा जन्म झाला होता. धार्मिक मान्यता अनुसार श्री दत्तात्रय भगवान ह्यांना ब्रह्मा, विष्णु व महेश ह्यांचे रूप मानले जाते म्हणूनच त्याना श्री गुरुदेव दत्त संभोदतात. श्री दत्तात्रय भगवान ह्यांचा जन्म मार्गशीष महिन्यातील प्रदोष काळा मध्ये झाला होता. श्री दत्तात्रय भगवान हयाणी चोवीस गुरूंकडून शिक्षा प्राप्त केली होती.
The Dattatreya Jayanti 2021 Date, Puja Vidhi, Katha, Mahatva And Mantra can be seen on our YouTube Channel Dattatreya Jayanti 2021
मार्गशीष महिन्यातील पूर्णिमा ह्या दिवशी श्री दत्तात्रय भगवान जयंती म्हणून खूप श्रद्धा पूर्वक साजरी केली जाते. असे म्हणतात की काशी मधील मणिकर्णिका ह्या घाटावर श्री दत्तात्रय भगवान रोज स्नान करीत असत त्यामुळे तेथील श्री दत्तात्रय भगवान ह्यांच्या पादुका खूप महत्व पूर्ण आहेत. तसेच कर्नाटक मधील बेळगाव मुख्य पादुका सुद्धा पूजल्या जातात. दक्षिण भारतात श्री दत्तात्रय भगवान ह्यांच्या नावानी संप्रदाय सुद्धा आहे. त्यामुळे तेथे श्री दत्तात्रय भगवान ह्यांची बरीच मंदिरसुद्धा आहेत. असे म्हणतात की मार्गशीष पूर्णिमा ह्या दिवशी श्री दत्तात्रय भगवान ह्यांची पूजा अर्चा व उपवास केलातर सर्व मनोकामना पूर्ण होतात.
श्री दत्तात्रय भगवान ह्यांना परब्रह्म मूर्ति सद्गुरु, दत्तात्रेय भगवान, दत्ता भगवान, श्री गुरु देव दत्त, गुरु दत्तात्रेय ह्या नावांनी सुद्धा ओळखले जाते.
मार्गशीर्ष पूर्णिमा तिथि प्रारंभ 18 डिसेंबर 2021, शनिवार
7:24 सकाळी
मार्गशीर्ष पूर्णिमा तिथि समाप्त 19 डिसेंबर 2021, रविवार
10:05 सकाळी
दत्तात्रेय जयंती पूजा विधि:
दत्तात्रय जयंती ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्त म्हणजे पहाटे लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा. ह्यादिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्व आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी गंगा स्नान करून पवित्र श्री दत्त भगवान ह्याची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. त्याच बरोबर धूप दीप आरती व नेवेद्य दाखवावा. श्री दत्तात्रय भगवान ह्यांचा मंत्रजाप करावा. श्री दत्तात्रय भगवान ह्यांना गुरु मानून पूजन केल्यास भाग्य कारक आहे.
श्री दत्तात्रेय भगवान ह्यांची जन्म कथा:
श्री दत्तात्रेय भगवान हे श्री अत्री व अनुसूया ह्यांचे सुपुत्र होय. त्यांच्या जन्माची एक कथा म्हणजे कहाणी आहे.
देवी अनुसूया ही एक अत्यंत धार्मिक व पतिव्रता स्त्री होती. देवी अनुसूयाने ब्रह्मा, विष्णु व महेश सारखे पुत्र प्राप्तीसाठी तप केले होते.
त्रिदेव ब्रह्मा, विष्णु व महेश देवी अनुसूयाची पतिव्रता धर्म व तपस्यामुळे खूप प्रसन्न झाले.
एक दिवस तिन्ही देवीनि त्रिदेव ह्यांना देवी अनुसूयाची परीक्षा घ्या असे म्हणाले व त्रिदेव देवी अनुसूयाच्या घरी पोहचले व त्यांनी देवी अनुसूया हिला आम्हाला भूक लागली आहे जेवण द्यावे अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा देवी अनुसूयानि आदरपूर्वक भोजन तयार करण्यास तयारी सुरू केली.
मग त्रिदेव हयानी देवी अनुसूया हयना सांगितले की तुम्ही निरवस्त्र होऊन श्रद्धापूर्वक आम्हाला भोजन द्यावे. मग देवी अनुसूयानि आपल्या दिव्य शक्तीने त्रिदेव हयानी नवजात बाळकांचे रूप देवून त्यांना स्तन पान करवले.
ऋषि अत्री आल्यावर देवी अनुसूया नि त्यांना सर्व घडलेली गोष्ट सांगितली तेव्हा ऋषि अत्रीहयाणी आपल्या मंत्र शक्तिनि तिन्ही देवांना एका रूपात परिवर्तीत केले त्यामुळे ह्या बालकाचे तीन मुख व सहा हात आहेत.
जेव्हा तिन्ही देवीना हा सगळा घडलेला प्रकार समजला तेव्हा त्या ऋषि अत्री ह्यांच्या कडे जावून त्रिदेवना परत पूर्व रूपात आणावे अशी आज्ञा करू लागल्या तेव्हा ऋषि अत्री हयाणी त्याना परत पूर्व रूपात आणले.
त्रिदेव देवी अनुसूयावर प्रसन्न झाले व त्यांनी आशीर्वाद देवून श्री दत्तात्रय ह्यांना उत्पन्न करून त्यांनी त्यांची शक्ति प्रदान केली.
अश्या प्रकारे श्री दत्तात्रय भगवान देवी अनुसूया व ऋषि अत्री ह्यांचे पुत्र झाले.
दत्तात्रेय जयंतीचे महत्व:
दत्त जयंती ह्यादिवशी श्री दत्तात्रय भगवान ह्यांची गुरु व भगवानच्या रूपात आराधना व स्तुति करतात.
श्री दत्तात्रेय भगवान ची आराधना व स्तुति करणे अत्यंत शुभ मंगलकारी मानतात.
दत्तात्रेय भगवानच्या कृपामुळे मनुष्यला खऱ्या ज्ञानाची प्राप्ति होते.
जीवनामध्ये आपले लक्ष्य प्राप्त करण्याची शक्ति भगवान श्री दत्तात्रेय ह्यांच्या कृपामुळे मिळते.
मनुष्यच्या भयाची समाप्ती श्री भगवान दत्तात्रय ह्यांच्या कृपाने होते. आत्माला मुक्ती मिळते. त्याच बरोबर कष्टा पासून मुक्ती मिळते. मानसिक शांती मिळते.
श्री भगवान दत्तात्रय मंत्र:
|| श्री गुरुदेव दत्त ||
आपल्याला ह्या आर्टिकल मधून श्री दत्तात्रय भगवान ह्यांची सर्व माहिती मिळावी म्हणून दिली आहे.