भगवान धन्वंतरी उपासना आरोग्यासाठी वरदान
आपल्याला माहीत आहेच भगवान धन्वंतरी हे आरोग्याचे देवता आहेत. त्यांची उपासना केल्यास आपली किस्मत चमकते जाणून घ्या.
इंडरदेव जेव्हा असुरांना घेऊन समुद्र मंथन करीत होते तेव्हा 14 वे रत्न उत्पन्न झाले ते म्हणजे भगवान विष्णु म्हणजेच भगवान धन्वंतरी होय. भगवान धन्वंतरी हे धनत्रयोदशी ह्या दिवशी समुद्र मंथन मधून अवतरले होते. म्हणूनच म्हणतात की भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णुचा अवतार आहेत.
The Bhagwan Dhanvantari Upasana And Powerful Mantra can be seen on our YouTube Bhagwan Dhanvantari Upasana And Powerful Mantra
भगवान धन्वंतरी ह्याना औषधाचे जनक मानले जाते. धनत्रयोदशी ह्या दिवशी भगवान धन्वंतरी हयानी आयुर्वेदाचा प्रादुर्भाव केला होता. असे म्हणतात की समुद्र मंथनच्या वेळी भगवान धन्वंतरी हे हातात अमृत कलश व आयुर्वेद घेऊन अवतरले होते. त्याच बरोबर त्यांना आयुर्वेदाचे आचार्य सुद्धा मानले जाते. तसेच भगवान धन्वंतरी ह्यांची जयंती धन व समृद्धीच्या संबंधित आहे. ते देवतांचे वैद्य आहेत व माता लक्ष्मीचे भाऊ सुद्धा आहेत.
न्वंतरीच्या चार हातांपेकी एका हातात शंख, एका हातात चक्र एका हातात जळू व एका हातात अमृताचा कलश आहे. भगवान धन्वंतरींच्या चार हातांतील आयुधे मनुष्यामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व व्याधींवरील निश्चित नेमके उपाय मानले जातात. धन्वंतरींच्या हातातील शंख, चक्र महत्त्वाचे प्रतीक मानतात.
भगवान धन्वंतरी ह्याना पितळ हा धातू अतिप्रिय आहे. म्हणूनच धनत्रयोदशी ह्या दिवशी लोक पितळ्याची भांडी खरेदी करून त्यामध्ये गोड पदार्थ ठेवून नेवेद्य दाखवतात. भगवान धन्वंतरी ह्यांची पूजा अर्चा केल्याने आपली किस्मत चमकते. तसेच त्यांची उपासना केल्यास धन व आरोग्याची प्राप्ती होते.
ब्रह्माजिनि अश्या प्रकारे आयुर्वेदाची रचना केली:
आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की सर्व प्रथम ब्रह्माजिनी एक सहस्त्र श्लोक असणाऱ्या आयुर्वेदाची रचना केली. इन्द्र भगवान हयानी आश्विन कुमार ह्याना आयुर्वेद शिकवले त्याच बरोबर त्यांनी भगवान धन्वंतरी ह्यांना सुद्धा आयुर्वेदामध्ये कुशल बनवले. धन्वंतरीच्या अगोदर आयुर्वेद हे गुप्त होते. पण सर्व प्रथम आयुर्वेदची विद्या ही विश्वामित्र ह्यांचे सुपुत्र सुश्रुत हे शिकले. भगवान धन्वंतरी ह्यांचे वंशज श्री देवोदास हयानी काशी ह्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा शल्य चिकित्सा विद्यायला सुरू करून सुश्रुत ह्याना त्याचे प्रधाना चार्य बनवले.
भगवान धन्वंतरी ह्याचा आरोग्य महामंत्र:
ॐ नमो नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धनवंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय।
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप
श्री धन्वंतरि स्वरूप श्री श्री श्री अष्टचक्र नारायणाय नमः॥
मंत्राचा अर्थ:
परम भगवान धन्वंतरी ह्यांना सुदर्शन वासुदेव धन्वंतरी म्हणतात, जे हातात अमृत कलश घेऊन उभे आहेत, ते सर्व भयनाशक आहेत, सर्व रोगनाशक आहेत, तिन्ही लोकांचे स्वामी असून ते त्यांचा निर्वाह करतात अश्या विष्णु स्वरूप भगवान धन्वंतरी ह्यांना सादर प्रणाम||
भगवान धन्वंतरी हयानी साधना करण्यासाठी मंत्र:
“ॐ धन्वंतरये नमः”॥
भगवान श्री धन्वंतरि ह्यांचा मंत्र सर्व रोगापासून दूर ठेवणारा:
“ॐ रं रूद्र रोगनाशाय धन्वन्तर्ये फट्।।”
ह्या मंत्राचा जाप करताना हातात अक्षता घेऊन 108 वेळा करावा.