वास्तु टिप्स लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये झाडू कुठे व कसा ठेवावा
वास्तू शास्त्रा नुसार घरामध्ये झाडू कुठे व कसा ठेवावा त्यामुळे लक्ष्मीचा वास नेहमी राहील.
वास्तू शास्त्रा नुसार प्रतेक कामासाठी वेगवेगळे नियम आहेत. त्या नियमा नुसार आपण घरातील वस्तु ठेवल्यातर शुभ घटना होतात. तसेच वास्तू शास्त्रा नुसार आपण झाडू सुद्धा योग्य त्याठिकाणी ठेवला नाहीतर लक्ष्मी माता नाराज होऊन घरातून निघून जाते. म घरात दारिद्रता येते. जर घरातील दारिद्रता दूर करायची असेलतर वास्तू शास्त्रा नुसार योग्य त्याठिकाणी झाडू ठेवावा. त्याजागा कोणत्या आहेत ते आपण पाहू या.
The Vastu Tips For Broom : Where and How to Keep Broom at Home can be seen on our YouTube Vastu Tips For Broom
आपण झाडूला धनाच्या लक्ष्मीचे प्रतीक मानतो. वास्तू शास्त्रामध्ये झाडूला विशेष महत्व आहे. चला आपण पाहूया झाडू संबंधित काही गोष्टी.
प्रतेक वस्तूचा काहीना काही पॉजीटिव किंवा नेगेटिव इम्पेक्ट आपल्या जीवनावर पडत असतो. त्यामधील एक वस्तु म्हणजे झाडू होय. पण झाडू लक्ष्मी माताचे प्रतीक आहे. वास्तू शास्त्रामध्ये झाडूचे विशेष महत्व आहे.
आपण आता झाडू संबंधित काही नियम पाहू या त्यामुळे आपल्या जीवनातील परेशानी दूर होतील.
सूर्यास्त नंतर झाडू मारताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
वास्तू शास्त्रा नुसार संध्याकाळी घरात झाडू मारल्याने लक्ष्मी अप्रसन्न होते. म्हणून संध्याकाळी घरात झाडू मारू नये. पण काही कारणाने आपल्याला घरात संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारायला लागला किंवा आपण घरात कामावरून रात्री उशिरा येत असाल तर आपण एक काम करू शकता. संध्याकाळी किंवा रात्री उशिरा घरी आल्यावर किंवा बाहेर गावावरून आल्यावर घरात खूप धूळ झाली असेलतर रात्री घरात झाडू मारून कचरा घराच्या बाहेर न फेकता घरातील डस्टबिनमध्ये टाकावा मग दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर फेकावा. कारण की संध्याकाळी किंवा रात्री उशिरा झाडू मारून कचरा घराबाहेर टाकला तर लक्ष्मी माता घरातून बाहेर जाते व घरात दारिद्रता येते.
नवीन झाडू खरेदी करण्यासाठी शुभदिवस:
जर आपल्याला नवीन झाडू खरेदी करायचा असेल किंवा वापरायचा असेलतर त्यासाठी काही नियम आहेत. वास्तू शास्त्रा नुसार आपल्याला जुना झाडू बदलून नवीन झाडू वापरायचा असेलतर शनिवार हा दिवस चांगला आहे. शनिवार ह्या दिवशी नवीन झाडूचा उपयोग करणे शुभ मानले जाते. जर आपल्याला नवीन झाडू खरेदी करायचा असेलतर कृष्णपक्षमध्ये झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच शुक्ल पक्षामध्ये झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते. म्हणून झाडू नेहमी कृष्ण पक्ष मध्येच खरेदी करावा.
घरामध्ये स्वयंपाक घरात झाडू का ठेवू नये:
घरामध्ये स्वयंपाक घरात झाडू ठेवला तर आर्थिक नुकसान होते. वास्तू शास्त्रानुसार काही वास्तू अश्या असतात की त्या स्वयंपाक घरापासून दूर ठेवाव्या. किचनमध्ये झाडू किंवा पोछा मारायचा कपडा ठेवू नये कारण ह्या दोन्ही वास्तुनि ह्या घरातील घाण साफ करण्याच्या संबंधित आहेत. व त्यामुळे किचनघाण होऊ शकते व आपण तेथे जेवण बनवतो व सेवन करतो. त्यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे झाडू किचन पासून दूर ठेवावा व किचन स्वच्छ राहून घरात खुशियाली राहते.
झाडू कधीसुद्धा अश्या प्रकारे ठेवू नये
वास्तू शास्त्रानुसार आपल्या घरातील झाडूला आपल्या धना सारखे लपवून ठेवावे. झाडू उघड्यावर ठेवणे किंवा सगळ्यांच्या नजरा त्यावर पडणे हे शुभ मानले जात नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की झाडू कधीसुद्धा उभा ठेवू नये. त्यामुळे घरात दारिद्रता येते. झाडू नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा.
तुटलेला झाडू देते परेशानीची दावत:
वास्तू शास्त्रा नुसार झाडू तुटल्यावर लगेच बदलला पाहिजे. तुटलेल्या झाडूनी घराची साफसफाई करणे म्हणजे अनेक संकटांना आमंत्रण देणे. झाडू लक्ष्मी माताचे प्रतीक आहे त्यामुळे त्याला कधी सुद्धा पाय लावू नये. त्यामुळे लक्ष्मी माताचा अपमान होऊन आर्थिक संकट येऊ शकतात. समजा चुकून सुद्धा झाडूला पाय लागला तर झाडूला लगेच नमस्कार करावा.
तिजोरी किंवा कपटा जवळ झाडू कसा ठेवावा:
आपण ज्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये धन किंवा मोल्यवान वास्तू ठेवतो त्या तिजोरी जवळ किंवा कपाटाच्या जवळ किंवा मागे झाडू ठेवू नये. त्यामुळे धनाची हानी होते.
झाडू ठेवायची योग्य दिशा:
वास्तू शास्त्रा नुसार घरात झाडू नेहमी दक्षिण ह्या दिशेला ठेवणे लाभदायक आहे. असे केल्याने घरात दारिद्रता कधी सुद्धा येत नाही व नेहमी आनंदी वातावरण राहते.
रात्रीच्या वेळी झाडू कोठे ठेवावा:
वास्तू शास्त्रा नुसार रात्री झाडू आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर ठेवणे लाभदायक आहे. शास्त्रा नुसार रात्री झाडू घरासमोर ठेवल्याने घारत नकारात्मक शक्ति प्रवेश करीत नाही.